(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Money Laundering Case : अनिल देशमुखांचा जेल मधील मुक्काम पुन्हा वाढला, हायकोर्टाने जामीनावरील स्थगिती वाढवली
Money Laundering Case : राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला आहे. अनिल देखमुख यांच्या मंजूर केलेल्या जामीनावरील स्थगिती हायकोर्टानं वाढवली आहे.
Money Laundering Case : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीनावरील स्थगिती हायकोर्टानं वाढवली आहे. सीबीआयची विनंती हायकोर्टानं मान्य केली आहे. जामीन मंजूर केल्याच्या निकालाला मंगळवारपर्यंत स्थगिती दिली आहे. जामीन मंजूर होऊनही अनिल देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयातील आव्हानावर 27 डिसेंबरपर्यंत सुनावणी करून घेण्याची सीबीआयकडे संधी आहे.
अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला होता. परंतु, सीबीआयच्या विरोधानंतर न्यायालयाने दहा दिवसांसाठी म्हणजे 22 डिसेंबरपर्यंतल जामीनाला स्थगिती दिली होती. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीत ही स्थगिती 27 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा जेलमधील मुक्काम पुन्हा वाढला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या जामीनाला सीबीआयच्या विरोधानंतर न्यायालयाने दहा दिवसांसाठी म्हणजे 22 डिसेंबरपर्यंतल जामीनाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती वाढवण्यासाठी सीबीआयने हायकोर्टात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात यंदा सुट्टीकालीन कोर्ट उपलब्ध नसल्यामुळे 3 जानेवारीपर्यंत स्थगिती वाढवण्याची सीबीआयकडून विनंती करण्यात आली. त्यानंतर काल दुपारी अडीच वाजता न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यापुढे सीबीआयने आपला अर्ज तातडीच्या सुनावणीसाठी सादर केला. मात्र यावर काल सुनावणी झाली नाही. यावर उद्या म्हणजे आज सुनावणी होईल असे कोर्टाने म्हटले होते. त्यानुसार आज सुनावणी झाली आणि 27 डिसेंबर पर्यंत जामीनावरील स्थगिती वाढवण्यात आली आहे.
Money Laundering Case : अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना जामीन
दरम्यान, अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे (Sanjeev Palande) यांना काल मनी लाँड्रिंग प्रकरणात ( money laundering case) मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांनी दोन लाख रूपयांच्या जात मुचलक्यावर पालांडे यांना जामीन मंजूर केलाय. मात्र, अनिल देशमुखांप्रमाणेच सीबीआयच्या केसमध्येही अटक असल्यानं तूर्तास कारागृहातून पालांडे यांची सुटका होणार नाही.
Money Laundering Case : वर्षभरापासून देशमुख तुरुंगात
1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या अनिल देशमुखांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते.
महत्वाच्या बातम्या