एक्स्प्लोर

Nepal Gen-Z Protest: बालेन शाह, सुदन गुरुंग  दोन मिलेनियल, ज्या दोघांनी नेपाळच्या GenZ ला भडकावलं

Nepal GenZ Protest : नेपाळमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्यानं संतापलेल्या GenZ च्या आंदोलनामुळं पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला आहे. 

नवी दिल्ली : नेपाळमध्ये सोशल मिडिया (Nepal Social Media Ban) बंदी विरोधात GenZ नं केलेल्या आंदोलनामुळं देशातील सत्तेला हादरे बसले आहेत. नेपाळच्या पंतप्रधांनाना राजीनामा द्यावा लागला आहे. नेपाळ सरकारनं सोशल मीडियावर बंदी घातल्यानं GenZ नं कालपासून आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आंदोलकांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्र्यांचे बंगले आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयांना पेटवलं आहे.सेना आणि पोलिसांच्या हातातून आंदोलकांनी शस्त्र हिसकावून घेतली आहेत. नेपाळमध्ये GenZ आंदोलन करत असले तरी हे आंदोलन दोन मिलेनियलनं भडकावलं आहे. काठमांडूचे महापौर बालेन शाह (Balendra Shah) आणि सुदन गुरुंग (Sudan Gurung) या दोन्ही मिलेयनियलनी आंदोलन भडकेल अशा पद्धतीनं पोस्ट केल्या. 

नेपाळमधील केपी शर्मा ओली यांच्या सरकारनं 4 सप्टेंबर 2025 ला सोशल मिडिया साईटवर बंदी घातली होती. ज्यामध्ये यूट्यूब, फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम आणि व्हाटसअपचा समावेश होता. ज्यामुळं नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला होता. केपी शर्मा यांच्या सरकारनं सोशल मीडियावर बंदी घालताच 36 वर्षांचा तरुण सुदन गुरुंग यानं GenZ ला आंदोलन करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्या. ओली सरकारमधील भ्रष्टाचार, घराणेशाही, काही  व्यक्तींची वाढती संपत्ती याविरोधात सुदन गुरुंग आवाज उठवत होता. मात्र, त्याला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. 27 ऑगस्टला सुदन गुरुंग यानं एक पोस्ट लिहिली होती, त्यात 'जर आपण स्वत:ला बदललं तर देश स्वत: बदलेलं असं लिहिलं. 

बालेन शाह यांची पोस्ट  Balendra Shah Social Media Post 

7 सप्टेंबरला VPN चा वापर करत बालेन शाह यांनी एक पोस्ट लिहिली. ती पोस्ट अशी होती, उद्याची रॅली GenZ ची आहे, या रॅलीत कोणतीही पार्टी, नेता, कार्यकर्ता किंवा खासदारानं स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी सहभागी होऊ नये. मी वयाच्या कारणामुळं त्या रॅलीत जाऊ शकत नाही, मात्र माझा पूर्ण पाठिंबा आहे.

काठमांडूचे महापौर बालेन शाह यांचं वय 35 असल्यानं ते स्वत: आंदोलनात सहभागी झाले नाहीत मात्र त्यांच्या पोस्टनं आंदोलनाची दिशा ठरवली. त्यांच्या पोस्टला 20 हजार शेअर मिळाले, 40 हजारांपेक्षा अधिक कमेंट केल्या गेल्या, ज्यामुळं लाखो तरुण आंदोलनासाठी काठमांडूच्या रस्त्यावर उतरण्यास तयार झाले. 

सुदन गुरुंगची पोस्ट Sudan Gurung Social Media Post

यानंतर सुदन गुरुंग यानं एक पोस्ट केली, ज्यानं आंदोलनाचा भडका आणखी वाढला. त्याची पोस्ट अशी होती. 'आज जो दिवस आहे जेव्हा नेपाळचे तरुण उठतील आणि म्हणतील खूप झालं, हा काळ आमचा आहे, आमची लढाई आहे, ही आमच्यापासून, तरुणांपासून सुरु होते.

बालेन शाह आणि सुदन गुरुंग या दोघांच्या पोस्टमुळं GenZ चं आंदोलन पेटलं आणि 8 सप्टेंबरला लाखो आंदोलक रस्त्यावर उतरले. ज्यांनी राष्ट्रपती भवनावर, पंतप्रधान निवासस्थानावर दगडफेक केली. ज्यामुळं सैन्य आणि पोलिसांना फायरिंग करावी लागली. या आंदोलनात 20  पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला. 9 सप्टेंबरला आंदोलन पुन्हा भडकलं ज्यामुळं पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला आहे. राजीनामा दिल्यानंतर नेपाळच्या सैन्याच्या सुरक्षेत केपी शर्मा ओली सुरक्षित ठिकाणी रवाना झाले आहेत. आता नेपाळच्या पंतप्रधानपदासाठी बालेन शाह यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. आंदोलक त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Embed widget