ST Strike : एसटी संपावरील अंतिम तोडग्यासाठी कर्मचारी सरकारसोबत बैठकीला तयार
ST Strike Update : एसटी संपाचा तिढा सुटावा म्हणून एसटी कर्मचाऱ्यांकडून सरकारसमोर काही मागण्या समोर ठेवण्यात आल्या आहेत.
ST STRIKE गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावर तोडगा काढण्यासाठी मागील आठ दिवसांपासून मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठका सुरू आहे. या बैठकीत सरकारसोबत बातचीत करून मार्ग काढण्यासाठी एसटी कर्मचारी तयार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून मुंबईत आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employee) गुप्त बैठकीचे सत्र अखेर संपले. कर्मचाऱ्यांकडून संपावर मार्ग काढण्यासाठी मागील आठ दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे खलबतं सुरू होती. या बैठकीसाठी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक आगारातील दोन एसटी कर्मचारी आले होते. या बैठकीत कर्मचाऱ्यांकडून संपाचा तिढा सुटावा म्हणून सरकारसमोर काही मागण्या समोर ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सातवा वेतन आयोगाप्रमाणे पगार हमी सरकारने द्यावे, सर्व कर्मचाऱ्यांवरील कारवाया मागे घ्यावे यासोबत शिस्त आवेदन कार्यपद्धतीतील जाचक अटी रद्द करण्यात यावी आणि इतर अनेक मागण्या करण्यात आल्या आहे. सरकारसोबत बातचीत करुन मार्ग काढण्यासाठी कर्मचारी तयार आहेत.
मागील तीन महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू असून कर्मचारी संपावर ठाम आहे. अनेक आगारात अजूनही काही एसटी कर्मचारी कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळे प्रवासी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागतोय. एसटी विलिनीकरणाबाबतची भूमिका सरकारने स्पष्ट सांगितले आहे की विलिनीकरण शक्य नाही. आता त्यामध्ये सुधारणा अशी आहे न्यायालयातून त्याबाबत समिती नेमून त्या समितीची भूमिका आम्ही मान्य करु असे सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे सध्या एसटी विलिनीकरणाबाबतचा प्रश्न आता न्यायप्रविष्ट आहे.
संबंधित बातम्या :
Nanded: अवघ्या दोन दिवसांचे प्रशिक्षण अन् यांत्रिकी कर्मचारी बनले चालक तर वाहतूक नियंत्रक बनले वाहक, नांदेडमधील प्रकार
ST Strike : एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर, कामगार न्यायालयाचा निर्वाळा
ST strike : सदावर्तेंना निवडणं चूक होती, पवारांसोबत सकारात्मक चर्चा, आता कामावर या, ST कृती समितीचं आवाहन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha