एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुस्थितीतील एसटी बसेस टप्याटप्प्यानं एलएनजी इंधनावर रूपांतरित करणार!
एसटीच्या डिझेल खर्चात बचत करण्यासाठी टप्याटप्प्यानं सुस्थितीत असलेल्या बसेस एलएनजी इंधनावर रूपांतरित करणार असल्याची माहिती आहे. महसुलात वाढ होण्यासाठी खाजगी वाहन धारकांना बस बांधणीसाठी एसटी कडे आकर्षित करणार असल्याचं एसटी महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीतून कळलं आहे,
मुंबई: एसटीच्या एकूण महसुलाच्या 34 टक्के रक्कम इंधन खरेदीवर खर्च होत आहे. भविष्यात या खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने सध्या तांत्रिक दृष्ट्या सुस्थितीत असलेल्या बसेस डिझेल इंधनावरून एलएनजी इंधनावर रूपांतरित करण्यात येणार आहे. भविष्यात व्यावसायिक स्तरावर खाजगी बसेस बांधून त्याद्वारे महसूल मिळवण्याची योजना एसटी महामंडळाने तयार केली असून खाजगी वाहनधारकांना बस बांधणीसाठी एसटीकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केला जाणार आहे. भविष्यात वाहतुक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करून उत्पन्नाच्या मार्गावरील बस फेऱ्यांच्या संख्येत वाढ होणे अपेक्षित आहे. एसटीच्या खर्चात बचत करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत व्यावसायिक स्तरावर खाजगी बसेस बांधून त्याद्वारे महसूल मिळवण्याची योजना जरी वरकर्णी दिसत असली तरी भविष्यात यातून खाजगीकरणाला तर वाव मिळणार तर नाही ना? अशी शंका एसटीच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटीला होणार आर्थिक नुकसान व भविष्यात करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली काल रोजी एसटी महामंडळाच्या मुख्यालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला कोल्हापूरहून व्हिडिओ कॉलद्वारे परिवहन राज्य मंत्री सतेज पाटील यांच्यासह एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा- शासनाने एस.टी. महामंडळाला 1000 कोटींचे अनुदान द्यावे, इंटकची मागणी
यावेळी मंत्री अनिल परब म्हणाले कि, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाला होणाऱ्या आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, याची सविस्तर चर्चा बैठकीत करण्यात आली. त्यानुषंगाने भविष्यात खर्चामध्ये बचत करणे व प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त अन्य उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
एलएनजी इंधनावरील बसेसना प्राधान्य
सध्या एसटी महामंडळामध्ये 18 हजार 500 बसेस आहेत. यासर्व बसेस डिझेल इंधनावर चालतात. एसटीच्या एकूण महसुलाच्या 34 टक्के रक्कम इंधन खरेदीवर खर्च होत आहे. भविष्यात या खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने सध्या तांत्रिक दृष्ट्या सुस्थितीत असलेल्या बसेस डिझेल इंधनावरून एलएनजी इंधनावर रूपांतरित करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. महिन्याभरापूर्वी एसटीने सुरु केलेल्या मालवाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
खाजगी बसेस बांधणीला सुरुवात करणार
एसटीकडे सध्या तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. या कार्यशाळेमध्ये एसटी बसेसची पुनर्बांधणी करण्यात येते. भविष्यात व्यावसायिक स्तरावर खाजगी बसेस बांधून त्याद्वारे महसूल मिळवण्याची योजना एसटी महामंडळानं तयार केली असून खाजगी वाहन धारकांना बस बांधणीसाठी एसटीकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न केला जाणार आहे.
व्यासायिक तत्वावर टायर पुनर्रस्थिरीकरण प्रकल्प सुरु करणार असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं. भविष्यात या प्रकल्पाची क्षमता लक्षात घेता एसटीची गरज भागवून व्यावसायिक तत्वावर टायर पुनर्रस्थिरीकरण प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. याबरोबरच मंत्री परब यांनी एसटी महामंडळाच्या जागेचा व्यावसायिक वापर करण्याच्या दृष्टीने व्यवहारिक योजना तयार करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिलेत. याबरोबरच भविष्यात वाहतुक व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल करून उत्पन्नाच्या मार्गावरील बस फेऱ्यांची संख्या वाढवावेत, असे निर्देशही अनिल परब यांनी यावेळी दिलेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
भंडारा
Advertisement