एक्स्प्लोर
Advertisement
मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग करणाऱ्या एसटी चालकाचं निलंबन
'एबीपी माझा'ने प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बस चालकाची बातमी दाखवल्यानंतर एसटी प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात मोबाईलवर बोलत दहा मिनिटं एसटी बस चालवणाऱ्या चालकाचं निलंबन करण्यात आलं आहे. 'एबीपी माझा'ने प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या बस चालकाची बातमी दाखवल्यानंतर एसटी प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली.
देवगड एसटी आगाराचे व्यवस्थापक देवीदास चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.
गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलू नये, अशा सूचना एसटी प्रशासनाकडून चालकांना दिल्या जातात. त्यासंदर्भात चालकांचे प्रबोधनही केले जाते. मात्र या नियमाला हरताळ फासला जात असल्याचं सिंधुदुर्गात समोर आलं होतं.
निष्काळजी एसटी चालक आणि त्याचा बेजबाबदारपणा एका प्रवाशाच्या मोबाईल कॅमेरात कैद झाला होता. एसटी बसचा चालक तब्बल दहा मिनिटे मोबाईलवर बोलत ड्रायव्हिंग करत होता. एसटी बस प्रवाशांनी भरलेली होती. बुधवारची म्हणजे 5 सप्टेंबरची ही घटना असून, 4.30 वाजता सुटणाऱ्या देवगड-बोरिवली बसमध्ये हा प्रकार घडला होता.
सिंधुदुर्गातील हा प्रकार प्रवाशाने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केल्याने समोर आला आहे, मात्र कित्येक ठिकाणी असे प्रकार घडत असतील, याची नोंदच नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
भारत
Advertisement