एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुट्ट्या पैशांचे वाद आता मिटणार, एसटी प्रवाशांच्या हातात स्मार्ट कार्ड
यावर एसटी तर्फे चाचपणी सुरु असून काही तांत्रिक बाबींची पूर्तता येत्या काही दिवसात पूर्ण झाल्यास 1 मे पासून याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या विचारात एसटी प्रशासन आहे.
धुळे : ग्रामीण भागाची जीवन वाहिनी असलेली लालपरी अर्थात एसटी येत्या 1 मेपासून स्मार्ट होणार आहे. एसटी महामंडळ 1 मे पासून प्रवाशांसाठी स्मार्ट कार्ड कॅशलेस योजना सुरु करत आहे. यावर एसटी तर्फे चाचपणी सुरु असून काही तांत्रिक बाबींची पूर्तता येत्या काही दिवसात पूर्ण झाल्यास 1 मे पासून याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या विचारात एसटी प्रशासन आहे.
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून 1 मे रोजी प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते हे कार्ड प्रवाशांना दिलं जाईल. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या योजनेची घोषणा केली होती. शिवाय याची अंमलबजावणी 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनापासून केली जाईल, असंही जाहीर केलं होतं.
काय आहे एसटीची स्मार्ट कार्ड योजना?
या योजनेंतर्गत प्रवाशांना 50 रुपयांमध्ये स्मार्ट कार्ड दिलं जाईल. त्यावर सुरुवातीला किमान 500 रुपये भरणं आवश्यक आहे. त्यानंतर पुनर्भरणा रक्कम ही 100 च्या पटीत असेल. या योजनेचा लाभ प्रवाशांना येत्या महाराष्ट्र दिनापासून (1 मे, 2018 पासून) प्रत्येक आगारात जाऊन घेता येईल.
एसटीच्या प्रवासात तिकीट काढताना सुट्ट्या पैशांवरुन वाद झालेला अनेकदा पाहायला मिळतो. या सर्वातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. त्यानुसार ठराविक रकमेचं स्मार्ट कार्ड घेऊन त्याद्वारे त्या रकमे इतका एसटीचा कोणताही (साधी, रातराणी,हिरकणी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेध बस) प्रवास करणं आता प्रवाशांना शक्य होणार आहे. त्यामुळे खिशात सुट्टे पैसे आहेत की नाहीत, याची चिंता करण्याची गरज नाही.
हे स्मार्ट कार्ड एका व्यक्तीने काढलं तरी त्याच्या कुटुंबातील आणि मित्रांपैकी कुणीही प्रवासाला जाताना हे कार्ड वापरु शकतात. तसेच कितीही व्यक्तींची तिकिटे काढू शकतात. अर्थात, प्रत्येक व्यक्तीने जितका प्रवास केला तितके पैसे त्या कार्डमधून वजा होत राहतील. हे कार्ड नंतर रिचार्ज करावं लागेल. नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड, ई-वॉलेट या माध्यमातून हे कार्ड रिचार्ज करता येईल.
ऑनलाईन रिझर्व्हेशन आणि ऑफलाईन रिझर्व्हेशनसाठीही या कार्डचा वापर करता येणार आहे.
एसटीच्या या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून वीज बिल, मोबाईल रिचार्ज, डिश टीव्ही रिचार्ज आणि ऑनलाईन शॉपिंग करता येईल, असा दावाही एसटी प्रशासनाने केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement