सिडकोतील काही अधिकारी नालायक, भ्रष्ट , पैशांसाठी लोकांची पिळवणूक करतात, गणेश नाईकांचा संताप, म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार
सिडकोला (CIDCO) चले जाव बोलण्याची वेळ आली आहे. सिडकोतील काही अधिकारी नालायक, भ्रष्ट असल्याचे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी केलं.

Ganesh Naik : सिडकोला (CIDCO) चले जाव बोलण्याची वेळ आली आहे. सिडकोतील काही अधिकारी नालायक, भ्रष्ट असल्याचे वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी केलं. लोकांची विनाकारण पिळवणूक करतात याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली असल्याचे नाईक म्हणाले. सर्वच प्रशासनातील काही अधिकारी लोकांची मुद्दामहून पैशासाठी छळवणूक, पिळवणूक करतात असेही नाईक म्हणाले.
नौटंकीबाज अधिकाऱ्यांना कारवाई करणार आहे, अशांना सोडणार नसल्याचे गणेश नाईक म्हणाले. अधिकारी कामे करत नसल्याने लोकांना जनता दरबारात यावे लागत आहे, असेही नाईक म्हणाले. जनता दरबारात आलेले सर्व निवेदनांची सोडवणूक करणार असल्याचे नाईक म्हणाले. सिडकोच्या ताब्यात असलेल्या शहरातील गृहनिर्माण सोसायट्या फ्री होल्ड करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक लावणार आहेत. मोठ्या संख्येने गर्दी झाल्याने नाट्यगृहातून बाहेर येत लोकांची निवेदने स्वीकारावी लागल्याचे नाईक म्हणाले.
नवी मुंबईतील अडचणींवर मात करण्यासाठी हा जनता दरबार
आज गणेश नाईकांनी नवी मुंबईत जनता दरबार घेतला, त्यावेली ते बोलबत होते. सव्वा सात तास जनता दरबार चालल्याचे नाईक म्हणाले. नवी मुंबईतील अडचणींवर मात करण्यासाठी हा जनता दरबार होता. काही अधिकारी स्वत: च्या स्वार्थासाठी नौटंकी करतात असे नाईक म्हणाले. गावठाणाच्या बाहेर लोकांनी गरजेपोटी घरे बांधली आहेत असे नाईक म्हणाले. सिडकोनी घेतलेले ठराव आहे, सिडकोचे काही अधिकारी लोकांची लुबाडणूक करतात असे नाईक म्हणाले. मी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे नाईक म्हणाले.
3 मार्चला अधिवेशन सुरु होत आहे. त्याआधी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन न्यायनिवाडा करण्यासंदर्बात चर्चा करणार असल्याचे नाईक म्हणाले. फार मोठ्या प्रमाणात माणवाने निर्माण केलेल्या अडचणी आहेत. पण स्वत:च्या स्वार्थासाठी काही लोकांनी जनतेची कोंडी केली असल्याचे नाईक म्हणाले. आरोग्य खातं, पाणीपुरवठा खातं, शिक्षण खात्यामध्ये तुमची किती गरज आहे? 13-13 वर्ष झालं अधिकारी एकाच ठिकाणी असल्याचे नाईक म्हणाले. काही ठिकाणी वशिल्यानं लोक भरली आहेत. चुकीची कामं करुन गरिबांची कुंटबणा कोणी करणार असेल तर मी सोडणार नाही असेही नाईक म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Ganesh Naik: एकनाथ शिंदे यांच्या बरोबर माझे शीतयुद्ध नाही, मात्र मी माझ्या भूमिकेवर ठाम; ठाण्यातील जनता दरबार संदर्भात मंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

