Ganesh Naik: एकनाथ शिंदे यांच्या बरोबर माझे शीतयुद्ध नाही, मात्र मी माझ्या भूमिकेवर ठाम; ठाण्यातील जनता दरबार संदर्भात मंत्री गणेश नाईकांची प्रतिक्रिया
Ganesh Naik : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बरोबर माझे शीतयुद्ध नाही. मी ठाणे येथे जनता दरबार घेणार हे सत्य आहे. अशी रोखठोक भूमिका राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी बोलताना मांडली आहे.

नवी मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बरोबर माझे शीतयुद्ध नाही. मी ठाणे येथे जनता दरबार घेणार हे सत्य आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी किंवा त्यांच्या इतर मंत्र्यांनी नवी मुंबईत जनता दरबार घ्यावा, मला अडचण नाही. उलट यामुळे लोकांचे प्रश्न अधिक सोडविले जातील. अशी रोखठोक भूमिका राज्याचे वन मंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी बोलताना मांडली आहे. ते नवी मुंबई येथे बोलत होते.
चंद्रपूर जिल्ह्यात 8 ते 10 वाघांच्या झालेल्या शिकारी संदर्भात पुढील पाच दिवसात उच्च स्थरीय बैठक बोलवली असून या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याची माहिती राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे विदेशात व्यवहार केल्याचे तपासात पुढे येत आहे. याबाबत अजून कुणाचा सहभागी आहेत का याचा देखील तपास सुरू असल्याचे वन मंत्री गणेश नाईक म्हणाले.
नवी मुंबईची लोकसंख्या भविष्यात 30 लाखापर्यंत जावू शकते. यामुळे पाण्याची टंचाई भासू नये यासाठी अजून कुठून पाणी स्त्रोत निर्माण करता येतील का याचा शोध सुरू. मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बैठक झाली आहे. यात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे ही गणेश नाईक म्हणाले.
एकनाथ शिंदेंच्या आमदारांवर फडणवीसांचे कंट्रोल - संजय राऊत
एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदारांवर पूर्णपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कंट्रोल आहे. एकनाथ शिंदे हे स्वत:ला अपमानित केल्याच्या दु:खातून बाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या फारसे संबंध राहिलेले नाहीत, असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील ‘रोखठोक’ या सदरातून केला आहे.
महाराष्ट्रातल्या सरकारला बहुमत असले तरी ते एकसंघ नाही. एकमेकांना विरुद्ध कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद भारतीय जनता पक्षाने पूर्णपणे संपवली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा सरपटणारा प्राणी झाला असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे खाजगीत सांगतात की विधानसभा निवडणुकीनंतर मीच मुख्यमंत्री राहील, असे मला वचन दिल्यामुळे मी फुटलो. निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना बाजूला करण्यात आले. काही मंत्रीपदं दिली, काही महत्त्वाची खाते दिली, उपमुख्यमंत्री पद दिले पण एकनाथ शिंदे यांचा चेहरा पाहिला तर ते अजूनही गुंगीत आहेत. एकनाथ शिंदे अजून धक्क्यातून सावरलेले नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
