एक्स्प्लोर
Advertisement
साप पकडण्यासाठी यंत्र, औरंगाबादमधील सर्पमित्राचं संशोधन
औरंगाबाद : एखादा साप दिसला की आपण काय करतो, पटकन आपला मोबाईल घेतो आणि नंबर असेल तर सर्पमित्राला फोन करतो. सर्पमित्र आपल्या जीवाची बाजी लावून सापाला पकडतो. कधी-कधी तर साप पकडताना सर्पमित्रांचे जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, आता औरंगाबादमधील सर्पमित्र नितेश जाधव यांनी नागरिकांनाही अगदी सहजपणे साप पकडता येईल, असे यंत्रच तयार केले आहे.
घरच्या आसपास एखादा साप निघाला की आपली पळताभूई थोडी होते. हातपाय थरथरायला लागतात. लोक गोळा होतात. मात्र सापाला पकडण्याची कोणाची हिंमत होत नाही. बऱ्याचदा हे चित्र पावसाळा आला की अनेक ठिकाणी पहावयास मिळते. मग साप पकडणाऱ्यांना बोलावले जाते. बऱ्याचदा ते वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिकांनाही अगदी सहजपणे साप पकडता येईल, असे यंत्रच नितेश जाधव या सर्पमित्राने तयार केले आहे.
हे साप पकडण्याचं यंत्र जागतिक दर्जाचे असल्याचा दावा नितेशचा आहे. नितेश हा शेंद्रा एमआयडीसीत एका कंत्राटदाराकडे कामगार म्हणून काम करतो. साईटवर कामं करताना तेथे अनेक वेळा साप निघायचे. ते पकडून सर्पमित्रांना देणे किंवा तेथील जलाशयात सोडण्याचे काम तो करत होता. आजवर नितेशने दोन हजार साप पकडले आहेत.
भारतात सध्या उपलब्ध असलेल्या स्नेक कॅचरने सापांचा मणका तुटतो, असा त्याचा अमुभव आहे. त्यानंतर त्याने यू ट्यूबवर स्नेक कॅचरची माहिती शोधली आणि स्वत: घरीच स्नेक कॅचर तयार केले.
सापाला इजा न होता, त्याला पकडता यावे यासाठी त्याने नागाच्या फण्यासारखाच मेटलचा जबडा तयार केला. आतल्या बाजूने पॉलियुरॅथिन या पॉलिमरची गादी लावली आहे. त्यामुळे साप या काठीने पकडला तर त्याला कोणतीही इजा होत नाही. शिवाय नागरिकांना पाहिजे त्या लांबीचे स्नेक कॅचर तयार करून देण्याची नितेशची तयारी आहे. त्यामुळे हे साप पकडण्याचे यंत्र नक्कीच उपयोगी ठरेल यांत शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement