एक्स्प्लोर
Advertisement
नंदुरबारमध्ये गणपती विसर्जनादरम्यान 6 तरुणांचा बुडून मृत्यू
गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. शहादा तालुक्यातील वडछील गावात ही घटना घडली आहे.
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. पाच दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. शहादा तालुक्यातील वडछील गावात ही घटना घडली.
गणपती विसर्जनासाठी हे सहा तरुण कमरावद येथील तलावात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यांच्यासोबत असलेल्या तरुणांनाही पोहता येत नसल्याने त्यांनी आरडाओरडा सुरु केला. त्यावेळी आवाज ऐकूण स्थानिकांनी या तरुणांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत या सर्वांचा मृत्यू झाला होता. म्हसावाद ग्रामीण रुग्णालयात त्यांचे मृतदेह पाठवण्यात आले आहेत.
मृत तरुणांची नावे
1. कैलास संजय चित्रकथे 2. सचिन सुरेश चित्रकथे 3. रविंद्र शंकर चित्रकथे 4. विशाल मंगल चित्रकथे 5. दीपक सुरेश चित्रकथे 6. सागर आप्पा चित्रकथे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
पुणे
भविष्य
राजकारण
Advertisement