एक्स्प्लोर

महाराजांच्या पुतळ्याची वेल्डिंग बिघडली की बिघडवली? वैभव नाईकांना पोलिसांनी बोलवले चौकशीला

छत्रपती शिवाजी महाराजांच पुतळा दुर्घटना प्रकरणी वैभव नाईक यांचं नाव येणे खरोखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.

 सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याबाबत  आम्ही भ्रष्टाचार झाल्याची  माहिती समोर आणल्याने पोलीस आम्हाला नोटीस बजावत असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार  वैभव नाईकांनी दिली. तर नाईकांच्या पोलीस चौकशीवरून, माजी खासदार निलेश राणेंनी टीका केली आहे.  शिवाजी महाराजाच्या पुतळा दुर्घटनेत वैभव नाईकांचं नाव घेणं, लज्जास्पद असून... असं काय झालं की वैभव नाईकांवर  संशय घ्यावा लागला, असा सवालही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे. 

  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी तज्ञ समितीने अहवाल सादर केला आहे. तज्ञ समितीने दिलेल्या अहवालात वेल्डिंग नीट झाली नव्हती किंवा गंज चढला  अशी माहिती दिली आहे.  मात्र वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवण्यात आली हा विषय राहतो. याच कारणामुळे आमदार वैभव नाईक यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं. या चौकशीतून योग्य ती माहिती बाहेर पडेलच, असे निलेश राणे म्हणाले.  

वैभव नाईकांवर संशय घ्यावा लागला ही लाज वाटण्यासारखी गोष्ट : निलेश राणे

मात्र या पुतळा दुर्घटना प्रकरणी वैभव नाईक यांचं नाव येणे खरोखरच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. असं काय झालं की वैभव नाईक यांच्यावर संशय घ्यावा लागला. वैभव नाईकांवर संशय घ्यावा लागला ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या विषयात आमदार म्हणून वैभव नाईक यांचे नाव आले हा शरमेने मान खाली घालायचा विषय आहे, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर केला आहे.

पोलिसांनी नोटीस बजवल्यानंतर काय म्हणाले वैभव नाईक?

संवेदनशील विषयात पोलिसांनी आरोपी संदर्भात माहिती देणं गरजेचं होत. पहिल्या पासून आमचं पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला हे आरोप तेव्हाही होते आणि आताही आहेत. आम्ही भ्रष्टाचार बाबत माहिती समोर आणत असल्याने पोलीस आम्हाला नोटीस बजावत आहेत. जयदीप आपटे आणि चेतन पाटील यांच्या व्यतिरिक्त कोणाचीही चौकशी केली नाही. अहवालात स्पष्ट नमूद केलं की महाराजांचा पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला हे समोर आल आहे. चुकीच्या पद्धतीने पुतळा उभारला तर त्यांचं बिल अदा का करण्यात आलं. अहवाल सादर केला तो खरा असेल तर पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी. जयदीप आपटे याचं स्टेटमेंट बाहेर आल तर दोषी कोण आहेत हे समोर येईल, असे वैभव नाईक म्हणाले.

हे ही वाचा :

कुडाळमध्ये वैभव नाईक विरुद्ध निलेश राणे लढत जवळपास निश्चित, दोन्ही गटांची जोरदार तयारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget