Sindhudurg Airport : कोल्ह्यानं रोखलं चिपी विमानतळावर लँडिंग; दहा मिनिटं विमानाच्या आकाशात घिरट्या, प्रवासी भयभीत
Sindhudurg Airport : एका कोल्हानं विमानाचं लँडिंग रोखलं असून यामुळे हे विमान तब्बल 10 मिनिटांसाठी आकाशात घिरट्या घालत होतं. यामुळे प्रवशांमध्येही भितीचं वातावरण निर्माण झालं होतं.
Sindhudurg Airport : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालं आणि या विमानतळावरुन विमान सेवा सुरु झाली. परंतु, एका घटनेमुळं नव्यानं सुरु करण्यात आलेल्या या विमानतळावर एका घटनेमुळं दहा मिनिटांसाठी लॅन्डिंग रखडलं होतं. मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालण्याची वेळ आली. यासाठी कारण ठरला कोल्हा. धावपट्टीवर अचानक आलेल्या कोल्ह्यामुळे यंत्रणेचीही तारंबळ उडाली.
सिंधुदुर्ग विमानतळ सुरु झाल्यानंतर या विमानतळावर असा एक प्रसंग आला की, मुंबईवरून आलेल्या विमानाला धावपट्टीवर उतरण्यासाठी दहा मिनिटे अवकाशात घिरट्या घालण्याची वेळ आली. त्याचं असं झालं धावपट्टीवर कोल्हा आला होता. हा कोल्हा धावपट्टीवर असल्याचे विमानाच्या पायलटला समजले. त्यांनी तात्काळ विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढण्यास सांगितले. या कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढल्यानंतर दहा मिनिटांनी विमान धावपट्टीवर उतरविण्यात आले. यामुळे प्रवाशांमध्ये सुरुवातील भिती निर्माण झाली होती. तसेच यावरुन विविध चर्चा रंगल्याचंही पाहायला मिळालं.
चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळाच्या आजूबाजूला कोल्ह्यांचा कळप आहे आणि हे कोल्हे आपल्या भक्षकासाठी फिरत असतात. दरम्यान विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर या विमानतळावर पहिल्यांदाच कोल्ह्याचे दर्शन झाले. विमानसेवा सुरु झाल्यानंतर काही दिवसांनी या धावपट्टीवर कोल्ह्यांचा वावर दिसला. मुंबईवरून सिंधुदुर्ग विमानतळावर उतरणाऱ्या विमानाच्या पायलटला धावपट्टीवर प्राणी असल्याचे निदर्शनास आले. हे विमान धावपट्टीवर न उतरता पायलटने पुन्हा विमान आकाशात झेपावले आणि संबंधित यंत्रणेला धावपट्टीवर कोणता तरी प्राणी असल्याचे सांगितले तात्काळ सुरक्षा यंत्रणेकडून धावपट्टीवर पाहणी केली असता त्यांच्या निदर्शनास कोल्हा असल्याचे दिसून आले. या सुरक्षा यंत्रणेने कोल्ह्याला धावपट्टीवरून बाहेर काढले. त्यानंतर दहा मिनिटांनी या धावपट्टीवर हे विमान उतरविण्यात आले. मात्र याची चर्चा प्रवाशांमध्ये चांगलीच रंगली होती. या विमानतळाच्या सर्व बाजू संरक्षण भिंत असून पूर्णपणे बंदिस्त केलं आहे. तरी हा कोल्हा कोणत्या मार्गाने धावपट्टीवर आला याचा शोध मात्र सुरक्षा यंत्रणा घेत आहे. जेणेकरुन पुन्हा असा प्रकार टाळण्यास मदत होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :