Sanjay Raut : नवनीत राणा यांनी 'डी गँग'शी संबंधित युसूफ लकडावालांकडून कर्ज घेतलं, ED चौकशी करणार का?; संजय राऊतांचा आरोप
Sanjay Raut : युसूफ लकडावाला हे नाव अंडरवर्ल्डशी संबंधित असून त्याच्याकडून खासदार नवनीत राणा यांनी कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई: राणा दाम्पत्य आणि शिवसेना हा वाद काही शमण्याची चिन्हं नसून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. युसूफ लकडावाला हे नाव अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. हा प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी आता त्याची चौकशी करणार का असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
नवनीत राणा ने युसुफ लकड़ावाला से ₹80 लाख का लोन लिया था,जिनकी जेल में मौत हो गई थी।उसी लकड़ावाला को @dir_ed ने मनी लॉन्ड्रिंग मामले में गिरफ्तार किया था व उसके डी गैंग से संबंध भी थे।
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 26, 2022
मेरा सवाल-क्या ED ने इसकी जांच की ? राष्ट्रीय सुरक्षा का मामला है! @KiritSomaiya @sanjayp_1 pic.twitter.com/u0h8cmT0He
युसूफ लकडावाला हे डी गँगशी संबंधित हे नाव असून त्याच्याकडून नवनीत राणांनी हे 80 लाखांचं कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी नवनीत राणांचे एक अॅफिडेव्हिट शेअर केलं आहे. त्यामध्ये नवनीत राणा यांनी युसूफ लकडावाला याच्याकडून 80 लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचं स्पष्ट दिसतंय. हा मुद्दा आता राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असून ईडी या प्रकरणाचा तपास करणार का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
युसूफ लकडावाला या व्यक्तीला ईडीने दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत ताब्यात घेतलं होतं. तुरुंगात असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनाही दाऊदशी संबंध असल्याचं कारण देत ईडीने ताब्यात घेतलं आहे. आता नवनीत राणा आणि युसूफ लकडावाला यांचा संबंध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे नवनीत राणांवर ईडी कारवाई करणार का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.