एक्स्प्लोर
बुलेट ट्रेनविरोधात शिवसेना आक्रमक, 70 गावात संघर्षयात्रा काढणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या बुलेट ट्रेनविरोधात आता शिवसेना आणखी आक्रमक झाली. यासंदर्भात शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी संघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती दिली आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या बुलेट ट्रेनविरोधात आता शिवसेना आणखी आक्रमक झाली. यासंदर्भात शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी संघर्ष यात्रा काढणार असल्याची माहिती दिली आहे.
विधान भवन, लोकसभा यांच्याइतकीच ग्रामसभा महत्त्वाची आहे. ग्रामसभेने बुलेट ट्रेन नको असल्याचे प्रस्ताव मंजूर केलेत, आता हे प्रस्ताव दिल्ली आणि पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ज्या 70 गावांनी बुलेट ट्रेनला विरोध केला आहे, त्याच गावांमधून आपण संघर्ष यात्रा काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बुलेट ट्रेनविरोधाची दिशा ठरवण्यासाठी पालघऱमध्ये आज बैठक बोलावण्यात आली होती. ज्यात गोऱ्हेंसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement