काँग्रेसच्या नाना पटोले यांच्या 'एकला चलो' भूमिकेला शिवसेना आणि राष्ट्रवादीचं उत्तर
आज सामनामधून तर नाना पटोले (Nana Patole) यांच्या वक्तव्याची दखल शिवसेनेने घेतली आहे. सत्ता अजीर्ण झाली असा टोला मारत ,कॉंग्रेस (Congress) स्वबळावर निवडणूक लढवणार असेल तर शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीला एकत्र निवडणूक लढवली पाहिजे हे प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला एक वर्ष आणि सात महिने झाले त्याच्या आतच काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार अस सांगूनही कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) 'एकला चलो' चा नारा देत आहेत.
आज सामनामधून तर नाना पटोले यांच्या वक्तव्याची दखल शिवसेनेने (Shivsena) घेतली आहे. सत्ता अजीर्ण झाली असा टोला मारत कॉंग्रेस (Congrss) स्वबळावर निवडणूक लढवणार असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादीला (NCP) एकत्र निवडणूक लढवली पाहिजे हे प्रत्युत्तर देण्यात आलं. यावरून शिवसेनेला कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वक्तव्य पटलेले नाही आणि सेनेत नाराजी असण्याची चिन्ह आहेत. याबाबत राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी देखील शिवसेनेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे.
महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत आणि या तीनही पक्षांनी एकत्र राहायला प्राधान्य दिलं पाहिजे. मात्र त्यातून एखाद्या पक्षाची स्वबळावर निवडणूक लढायचं इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष एकत्र राहतील. त्यादृष्टीने सामनामध्ये मत व्यक्त केलेलं दिसतंय, असं जयंत पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितलं. तसंच ही महाराष्ट्रातील जनतेची तशी इच्छा दिसतेय, असंही ते म्हणालेत. यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीने अप्रत्यक्ष काँग्रेसच्या भूमिकेबाबत हरकत घेतली अस चित्र आहे..
कॉंग्रेस महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील हे मुंबईच्या दौऱ्यावर असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या या भूमिकेमुळे कॉंग्रेस अडचणीत आली आहे. कॉंग्रेसने खरंच निवडणूक स्वबळावर लढवायचा निर्णय घेतला का? याच उत्तर आता प्रभारी एच के पाटील यांनाच द्यावं लागेल. काँग्रेसने भूमिका स्पष्ट न केल्यास महाविकास आघाडीत तिन्ही पक्षातील मतभेद वाढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
संबंधित बातम्या :