एक्स्प्लोर

Sanjay Raut : मी शरद पवारांचा माणूस हे लपून राहिले नाही : संजय राऊत यांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

Sanjay Raut : मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिलाय का? असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.

Sanjay Raut : मी शरद पवारांचा माणूस आहे, हे लपून राहिलेय का? असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. त्या भेटीवरुन चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला होता. शिवसेना खासदार संजय राऊत हे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे किंवा शिवसेनेचे नव्हेत तर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे समर्थक आहेत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. याला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. 

मी शिवसेनेमध्ये असताना शरद पवार यांच्यासोबतचे प्रेमाचे संबंध होते, त्यामुळेच आम्ही सत्ता स्थापन करु शकलो, असं संजय राऊत म्हणाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्यावर संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. तुम्ही मती भ्रष्ट झाली आहे हे माहिती आहे. पण तुमची मती इतकी भ्रष्ट झाली तर राज्यातील जनतेला तुमच्या एकंदरीत मानसिक आरोग्याविषयी शंका आहे, असा टोला राऊत यांनी लगावला. 

राज्यात भाजपचं सरकार न आल्यानेच खोट्या कारवाया करत सुटले आहेत. तुम्ही राजकारणालते मर्द असाल तर समोरासमोर येऊन लढा. केंद्रीय यंत्रणेचा शिखंडीसारखा वापर करुन मागे वार करु नका, असा टोला संजय राऊत यांनी भाजपावर लगावला. आम्ही शिवसैनिक, आमचं आयुष्य शिवसेनेत आणि बाळासाहेबांसोबत गेलं आहे. एका मर्यादेपर्यंत संयम पाळला, आता खूप झालं. शिवसेनेच्या वाघाला यांनी डिवलचलंय असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला. 

राज्यपाल हे भाजपचे शाखाप्रमुख आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली. मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही असं विरोधकांनी समजू नये, असाही इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिला. आयएनएस विक्रांतच्या निधीत राष्ट्रभक्तीच्या नावावर सोमय्या पिता पुत्रांनी कोट्यवधी रुपये गोळा केल्याचा आरोप पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केला. पीएमसी बँकेच्या माध्यमातून हा पैसा किरीट सोमय्यानी व्हाईट केल्याचा आऱोपही राऊत यांनी केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget