एक्स्प्लोर

शिर्डी साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार बैठक

साई संस्थानाच्या सच्चरित्रामध्ये साई बाबांचे जन्मस्थळ म्हणून 'पाथरी'चा उल्लेख केला आहे.

परभणी : जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे साईबाबा त्यांच्या जन्मस्थानावरुन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाथरी असा साईंच्या जन्मस्थानाचा उल्लेख करीत निधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या वादाला तोंड फुटले. पाथरी या जन्मस्थळाला शिर्डी ग्रामस्थांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर पाथरीकरांनीही आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी साई मंदिरात बैठकीचे आयोजन केलं आहे. दरम्यान, शिर्डी ग्रामस्थांची भूमिका ऐकून घेण्यासाठी बैठक घेण्याची तयारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शविली आहे. पाथरी येथील साई जन्मभूमीच्या विकासासाठी राज्य शासनाने 100 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिल्यानंतर शिर्डीतून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर पाथरी येथील साईभक्त आक्रमक झाले असून आज साई मंदिरात आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकी आयोजन केले आहे. 20 वर्षांपूर्वी केलेल्या संशोधनानंतर पाथरी हे श्री साईबाबांचे जन्मस्थान असल्याचे सिद्ध झाले आहे. मागील काही वर्षांत राज्यासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू इ. भागातून साईभक्त येथे दर्शनासाठी येतात. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सूचनेवर साई जन्मभूमीच्या विकासाचा आराखडा शासनाकडे पाठविला होता. या आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्यानंतर शिर्डी येथील भाविकांकडून त्यास विरोध केला जात आहे. त्यामुळे पाथरी साई भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आज पाथरी येथील साई मंदिरात आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. पाथरीच्या ग्रामस्थांचा नेमका दावा काय आहे? थोर अवतारी पुरूष संत श्री साईबाबा यांचे कर्मस्थान शिर्डी हे जगप्रसिद्ध आहे. श्री साईबाबांचे मूळ जन्मगाव, जन्मस्थान त्यांची पवित्र जन्मभूमी हे एक गुढ होते हे गुढ, कुतूहल साईबाबांचे परम भक्त विश्वास बाळासाहेब खेर(मुबंई)यांनी सतत 25 वर्षे संशोधन करुन सातत्याने परिस्थितीजन्य पुराव्यांचा पाठपुरावा, अनुभूती, श्री साईबाबांचे आशिर्वादाने "पाथरी" ता. पाथरी. जि. परभणी हे श्री साईबाबांचे मूळ जन्मस्थान आहे हे सिद्ध करण्यात यश मिळविले. मराठवाडा ही संतांची भुमी आहे. पाथरी गावातील एका भुसारी नाव असलेल्या ब्राह्मण कुटुंबात श्री साईबाबांचा जन्म झाला. श्री साईबाबांचे मूळ नाव "हरी" असे होते. 1978 जुन मध्ये ही मुख्य जन्मस्थानाची(वास्तुची, घराची )जागा विश्वास बी. खेर आणि अॅड. दिनकरराव चौधरी यांनी हैदराबाद येथे असलेल्या प्रोफेसर रधुनाथ भुसारी यांच्याकडुन विकत घेतली. मंदिराच्या बांधकामाच्या वेळी उत्खननात बाबांच्या घरातील वस्तु सापडल्या. जसे श्री हनुमाची मूर्ती. श्री साईबाबांचे कुलदैवत श्री हनुमान आहे. पुरातन हनुमानाचे मंदिर पाथरी गावाच्या बाहेर पंचबावडीचा हनुमान म्हणुन प्रसिद्ध आहे. शिवाय पाण्याचे मटके, जाती, चार पणत्या, श्री साईबांबाची 'बाळंत रूम" ई. वस्तू ध्यान मंदिर घरासहित भक्तांच्या दर्शनासाठी जतन करून ठेवल्या आहेत. प्रत्यक्ष श्री साई बाबांनी त्यांचे परमभक्त म्हाळसापतांना माझा जन्म(श्री साईबाबांचे )पाथरी येथील एका ब्राह्मण कुटुंबात झाला व लहाणपणीच त्यांच्या आईवडिलांनी त्यांना एका फकीरांच्या स्वाधीन केल्याचे सांगितले. या सर्व बाबींचे सखोल संशोधनानंतर साईबाबांचे जन्मस्थान पाथरी आहे हे निश्चित झाले. साई संस्थानच्या सच्चरित्रात जन्मस्थळाचा उल्लेख - साई संस्थानच्याच इंग्रजी सच्चरित्रात साई बाबा त्यांच्या म्हाळसापती या शिष्याला माझा जन्म पाथरी येथे ब्राम्हण कुटुंबात झाला आहे, असं सांगितल्याचा उल्लेख आहे. संत दासगणू महाराज यांनी त्यांच्या ओवीमध्ये कृष्णाचा जन्म जसा मथुरेत झाला आणि ते गोकुळात आले. तसाच साईबाबांचा जन्म शेलू मानवत म्हणजेच पाथरीत झाला आणि ते शिर्डीत गोकुळाप्रमाणेच आले असे सांगितले आहे. मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यांचे चिरंजीव विश्वास बाळासाहेब खेर 1985 ते 90 काळात साई संस्थानाचे विश्वस्त राहिलेले आहेत. त्यांनी 1972 पासुन साई बाबांच्या जन्मस्थानाच्या संशोधनाला सुरुवात केली. 1972 ची साई सच्चरित्राची आठवी आवृत्ती अध्याय 7 इथून संशोधनाला सुरुवात झाली. साई बाबांचा प्रचार करणारे संत दासगणू महाराज यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खेर यांनी चर्चा केली आणि 1925 मध्ये भक्ती सार अमृत ग्रंथ लिहिला होता. ज्यात साईंच्या जन्मस्थळाचा पाथरी, अशा उल्लेख केलेला आहे. साई लीला नावाचे मासिक होते. त्यात ही म्हाळसा पतीला साई बाबांनी पाथरी जन्मगाव असल्याचे सांगितल्याचा उल्लेख आहे. खेर यांनी पाथरी येथील दिनकरराव चौधरी यांची भेट घेतली. 1975 ते 78 मध्ये आणि पाथरी येथील साई बाबांना भेटलेल्या अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या ज्यात साई बाबांचे वास्तव कुठे होते हे सांगितलेले आहे. 1978 लाच त्यांनी साई बाबा ज्या भुसारी घराण्याचे होते. त्या भुसारी घराण्याचे शेवटचे रघुनाथ भुसारी यांच्याकडुन पाथरी येथील सध्याची मंदिराची जागा जिथं बाबांचं घर जतन करण्यात आलंय. ती 5000 ला विकत घेऊन पुढे काम सुरू केले. मुख्यमंत्र्यांची मध्यस्थीची भूमिका - मराठवाड्यातील पाथरी हे साईबाबांचे जन्मस्थान आहे. त्याच्या विकासासाठी 100 कोटींचा विकास आराखडा तयार केला. लवकरच त्याचे भूमिपूजन करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले. त्यास शिर्डीतील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे, तर पाथरीच्या ग्रामस्थांनी त्याचे समर्थन केले आहे. या वादात शिर्डी ग्रामस्थांची भूमिका ऐकून घेण्यासाठी 15 दिवसांत बैठक घेण्याची तयारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दर्शविली आहे. या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रपतींच्या वक्तव्यावरुनही वाद - वर्षभरापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साईंचं दर्शन घेतल्यावर आपल्या भाषणात साईंचा जन्म पाथरी या गावी झाल्याचं वक्तव्य केले होतं. त्याचवेळी साईंच्या जन्मस्थानचा मुद्दा निर्माण झाला. त्यावेळी ग्रामस्थांनी एकत्र येत राष्ट्रपतींना निवेदन देऊन आपला विरोध दर्शविला होता. आता पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा साईबाबांच्या जन्मस्थळाचा पाथरी असा उल्लेख करीत निधी देण्याची घोषणा केल्यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. एखाद्या गावच्या विकासाला निधी देणार असला तर हरकत नाही. मात्र, साईंचं जन्मस्थान म्हणून जर विकास होणार असेल तर त्याला तीव्र विरोध करण्याची भूमिका शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे यांनी घेतली आहे. संबंधित बातमी - शिर्डी साईंच्या जन्मस्थानावरुन नव्या वादाची शक्यता, परभणीतल्या पाथरीला मुख्यमंत्र्यांकडून 100 कोटींचा निधी Shirdi Sai Temple | सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत साई मंदिर बंद, मध्यान्ह आरतीनंतर साई दर्शन सुरु होणार | शिर्डी | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget