एक्स्प्लोर
शरद पवारांच्या नातवाचा रुबाब, सौंदर्या रजनीकांतच्या लग्नाला रोहित पवारांची हजेरी
सौंदर्या रजनीकांतच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी रोहित पवार चेन्नईला गेले होते. या निमित्ताने रोहित यांनी सिनेविश्वातील अनेक सेलिब्रेटींची भेट घेतली.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी दिग्दर्शिका सौंदर्या रजनीकांत यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. लग्नाच्या रिसेप्शनमधील रोहित पवारांचे रुबाबदार फोटो सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
दोनच दिवसांपूर्वी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्य विवाहबंधनात अडकली. 35 वर्षीय अभिनेता विशगन वनांगमुडीसोबत सौंदर्याने लगीनगाठ बांधली. या सोहळ्याचं रोहित पवारांना निमंत्रण देण्यात आलं होतं.
लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी रोहित पवार चेन्नईला गेले होते. लग्नसोहळ्याच्या निमित्ताने रोहित यांनी सिनेविश्वातील अनेक सेलिब्रेटींची भेट घेतली. या सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.
PHOTO | शरद पवारांचा नातू रोहित पवारांची सौंदर्या रजनीकांतच्या लग्नाला हजेरी
रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. बारामती अॅग्रो लिमिटेडचे ते सीईओ असून भारतीय साखर कारखान्यांच्या असोसिएशन (इस्मा)चे ते अध्यक्ष आहेत. रोहित हे राजेंद्र पवारांचे पुत्र, म्हणजेच शरद पवारांचे नातू, तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुतणे.
काही दिवसांपूर्वी रोहित यांनी अहमदनगरमधल्या प्रवरानगरमधील विखे पाटील सहकारी कारखान्याला भेट दिली. यावेळी सुजय विखे पाटील आणि रोहित एकत्र दिसले होते. पवार-विखे पाटील कुटुंबात वैर असताना तिसऱ्या पिढीतील दोन तरुण नेते एकत्र आल्याने या दोन कुटुंबांतील मैत्रीचा नवीन अध्याय लिहिणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement