एक्स्प्लोर

जंबो कोविड सेंटरमध्ये कसे उपचार दिले जातायेत? हा महत्वाचा प्रश्न ; शरद पवारांनी टोचले कान

शहरातील कोरोना रुग्णांनी 50 हजारांचा टप्पा आणि मृतांचा आकडा नऊशेच्या घरात जायची वेळ आली असताना ही तात्पुरती रुग्णालये रिकामी का? असा प्रश्न उपस्थित होताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अचानक पालिकेला भेट दिली.

पिंपरी- चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कसे योग्य उपचार दिले जातायेत. याबाबत राष्ट्रवादी, भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि पालिका आयुक्त टेंभा मिरवत होते. तेंव्हाच पवारांनी सर्वांचे कान टोचले. पुण्यात वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. या बाबीकडे पवारांनी बोट दाखवल आणि पिंपरीतल्या जंबो कोविड सेंटरमध्ये नेमकं कसे उपचार दिले जातायेत हा महत्वाचा प्रश्न असल्याचं म्हटलं. तुम्ही पाहताय पुण्यातील माध्यम प्रतिनिधीचा मृत्यू झाला. पत्रकार असो की सामान्य यात अनेक बिचाऱ्यांचे मृत्यू होतायेत. कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था करूनही अनेक बाबी समोर येतायेत. डॉक्टर्स नाही, नर्स नाही, वेळेवर औषध नाही अशा तक्रारी येतायेत अशी खंत ही पवारांनी व्यक्त केली. काही अति करतात पण असं घडता कामा नये अशी सूचना ही पवारांनी यावेळी दिली.

पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले. पुण्यातील जंबो कोविड सेंटरचा निष्क्रिय कारभार ही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला. तर पिंपरी चिंचवडमध्ये मृतांचा आकडा नऊशे घरात पोहचायला लागला असतानाही गेल्या आठवड्यात उद्घाटन झालेलं कोविड हॉस्पिटल अद्याप ही रिकामं असल्याची बाब एबीपी माझाने समोर आणली. तर अण्णा साहेब मगर स्टेडियमवरील 816 बेडस् च्या जंबो कोविड केअर सेंटरमध्ये ही केवळ 66 रुग्ण उपचार घेत असल्याचं समोर आलं.

शहरातील कोरोना रुग्णांनी 50 हजारांचा टप्पा आणि मृतांचा आकडा नऊशेच्या घरात जायची वेळ आली असताना ही तात्पुरती रुग्णालये रिकामी का? असा प्रश्न उपस्थित होताच दस्तुरखुद्द शरद पवार अचानक पालिकेत आले. त्यांनी पालिका आयुक्त, भाजप पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून कोरोनाची इत्यंभूत माहिती घेतली. यावेळी सर्वांनी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात कोरोना रुग्णांवर कसे यशस्वी उपचार दिले जातायेत, याचा टेंभा मिरवला. तेव्हा पवारांनी सर्वांचे कान टोचले.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात रुग्णांवर कसे उपचार दिले जातायेत, हा प्रश्न महत्वाचं असल्याचा शालजोडा लगावला. पुण्यात एका पत्रकाराला जीव गमवावा लागला. पत्रकार असो की सामान्य अनेक बिचाऱ्यांचे जीव जातायेत. त्यामुळे कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून ही रुग्ण आणि नातेवाईकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातायेत. डॉक्टर्स नाहीत, नर्स नाहीत, वेळेत औषधं नाहीत अशा तक्रारी समोर येतायेत, अशी खंत पवारांनी व्यक्त केली. काही अति करत असतीलही पण असे घडता कामा नये अशा सूचना ही पवारांनी दिल्या.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget