(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : लोकसभेचे मैदान मारल्यानंतर शरद पवार प्रथमच वर्ध्याच्या दौऱ्यावर; विदर्भातील राजकीय मंथन होण्याचीही शक्यता
Maharashtra Election 2024 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे 17 ऑगस्ट रोजी विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा हा विदर्भ दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे उद्या 17 ऑगस्ट रोजी विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) तोंडावर शरद पवारांचा हा विदर्भ दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे. विशेष बाब म्हणजे लोकसभेचे (Loksabha Election) मैदान मारल्यानंतर शरद पवार हे प्रथमच वर्ध्याच्या (Wardha News) दौऱ्यावर असणार आहे. वर्ध्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाला शरद पवार वर्ध्यात येत आहे. यावेळी याच कार्यक्रमाला भाजपचे जेष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याने सर्वांचे या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे.
लोकसभेचे मैदान मारल्यानंतर शरद पवार प्रथमच वर्ध्याच्या दौऱ्यावर
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली असून आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेची अद्याप घोषणा झालेली नसली तरी, आगामी विधानसभेसाठी सर्व पक्षांनी आपली कंबर कसली असून राजकीयदृष्ट्या सर्वांगाने जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच यंदाची राज्यातील विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे हे मात्र उघडपणे दिसून आले आहे. अशातच राज्यात महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्ध्यातील 4 विधानसभा मतदारसंघात नेमकं कुणाचं वर्चस्व असणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वर्ध्याच्या राजकीय पटलावर कधीकाळी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. पण, गेल्या दहा वर्षात भाजपने येथे चांगलीच मुसंडी मारली होती. दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले रामदास तडस गेल्या लोकसभेला तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर हॅट्रिक करण्यासाठी सज्ज होते. पण, या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उबाठा गटाच्या शिवसेनेने मूठ बांधली आणि प्रचारात आघाडी घेतली.परिणामी, ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आलेले आमदार अमर काळे यांना राष्ट्रवादीच्या तुतारीवर उमेदवारी मिळवली आणि विजयही! ऐकूनात विदर्भासह वर्ध्यातही महायुतीला जबर धक्का बसल्याचे बघायला मिळाले.
विदर्भातील जागाबाबत राजकीय मंथन होण्याचीही शक्यता
असे असतांना शरद पवार पुन्हा एकदा वर्ध्यात येत असल्याने विदर्भातील महाविकास आघाडीच्या जागांवर मंथन होण्याची शक्यता आहे. विदर्भात नेमक्या राष्ट्रवादीला जागा किती, यावरही मंथन होण्याची शक्यता आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील नेते वर्ध्यात एकवटणार असल्याचे बोलले जात असताना वर्ध्यात नेमक्या किती जागांवर राष्ट्रवादीचा दावा असेल? असाही प्रश्न आता चर्चेत आला आहे. त्यामुळे या शरद पवार यांच्या या दौऱ्याकडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा