दिल्या घरी सुखी राहा..! उस्मानाबादमध्ये नाव न घेता शरद पवार यांचा हात जोडून सल्ला
डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणा जगजीत सिंह पाटील यांचं पक्ष सोडून जाणं शरद पवार यांच्या चांगलचं जिव्हारी लागल्याचं दिसतंय. उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पवारांनी नाव न घेता इशाऱ्यानेच हात जोडून दिल्या घरी सुखी राहा, असं म्हटलंय.
उस्मानाबाद : पद्मसिंह पाटील आणि राणा जगजीत सिंह पाटील यांचं पक्ष सोडून जाणं शरद पवार यांच्या चांगलचं जिव्हारी लागल्याचं दिसतंय. उस्मानाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी केलेल्या एका कृतीवरुन तरी हेच स्पष्ट होतंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काही लोक येऊ इच्छीत आहेत. पण काही निकष आहेत. जसे उस्मानाबादचे त्यांना हात जोडून विनंती की दिल्या घरी सुखी राहा. (हात जोडून पवारांनी हातवारे केलं)
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक 2019 ची रणधुमाळी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं होतं. अनेक निष्ठावान समजले जाणारे पवारांचे साथीदार भाजपवासी झाले होते. यात सर्वात मोठ नाव होतं ते म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणा जगजीत सिंह पाटील. पाटील कुटुंबाने राष्ट्रावादीला सोडचिठ्ठी देणे पवारांच्या जास्तचं जिव्हारी लागलं होतं. कारण, पाटील कुटुंब केवळ पक्षाचे सदस्य नव्हेत तर पवारांचे नातेवाईकही आहेत. याच संदर्भातील एका प्रश्नामुळे नगर जिल्ह्यातील एका पत्रकार परिषदेत त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. तर एबीपीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला होता. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेकजण भाजपवासी झाले पण त्यांना सर्वात जास्त जिव्हारी लागलं ते पद्मसिंह पाटलांचं भाजपमध्ये जाणं.
एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाबाबत संकेत
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या भाजपला सोडचिठ्ठी देऊन पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या शक्यतांबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारणा केली असता, खडसे हे विरोधीपक्षनेते होते, अर्थमंत्री होते. एका पक्षाला उभारण्यात त्यांचं योगदान होते. याकडे लक्ष वेधत भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असल्याची टीका पवार यांनी केली. तसेच त्यांच्या त्यागाची सध्या नोंद घेतली जात नसल्याने ते सध्या पक्षांतराच्या विचारात असतील, असे मतही खडसेंच्या प्रवेशांबाबत पवारांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थिल्लरबाजी करु नये, देवेंद्र फडणवीसांची टीका
एकनाथ खडसे हे मातब्बर नेते आहेत सक्षम विरोधक आहेत. माजी महसूल मंत्री आहेत. काही वेळा त्यांनी आम्हाला शिव्याही दिल्या आहेत. मात्र, सध्या भाजपमध्ये त्यांची दखल घेतली जात नाही. तसेच दुर्दैवाने त्यांच्या त्यागाची नोंद घेतली नाही. त्यामुळे जिथे नोंद घेतली जाते, तिथे जावं असे त्यांना वाटत असेल तर काय करावे, असे म्हणत पवार यांनी त्यांच्या प्रवेशाबाबत सुचक वक्तव्य केलं आहे.
Sharad Pawar On khadse | भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवार म्हणतात...