एक्स्प्लोर
नोटाबंदीनंतर परिस्थिती जाणण्यासाठी पवारांची बँकेत हजेरी

बारामती : नोटाबंदीनंतरची परिस्थिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी बारामतीत थेट एका बँकेत हजेरी लावली. बँकेबाहेरुन जाताना गर्दी दिसल्यामुळे पवारांनी विचारपूस केली. बारामतीतील भिगवण रोडवरुन जात असताना ओरिएंटल बँकेबाहेर शरद पवारांना नागरिकांची गर्दी दिसली. त्यामुळे पवारांनी गाडी थांबवून रांगेत उभे असणारे ग्राहक आणि बँक कर्मचारी यांच्याकडून परिस्थिती समजावून घेतली. सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांनी जाणून घेतलं. बँकांना नोटा पुरवताना नेमक्या काय अडचणी येत आहेत, बँकांना नवीन नोटा उपलब्ध होत आहेत का? या सर्वच प्रश्नांची माहिती शरद पवारांनी घेतली.
आणखी वाचा























