Wardha News: काँग्रेसच्या सभेसाठी गेलो अन् हाती तुतारी घेऊन आलो; वर्धा लोकसभेसाठी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब
Wardha Lok Sabha 2024: वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब केला गेलाय. या उमेदवारीबाबत काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी स्वत: या बातमीला दुजोरा दिला आहे.
![Wardha News: काँग्रेसच्या सभेसाठी गेलो अन् हाती तुतारी घेऊन आलो; वर्धा लोकसभेसाठी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब sharad pawar group first probable candidate list of ncp for lok sabha election 2024 former congress mla amar kale confirm from wardha maharashtra marathi news Wardha News: काँग्रेसच्या सभेसाठी गेलो अन् हाती तुतारी घेऊन आलो; वर्धा लोकसभेसाठी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/23/9a9e93ac8fe0de85a01c18d0edbf0a671711191707190892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Wardha Lok Sabha 2024: शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी (NCP Lok Sabha Candidate List) पहिले 9 संभाव्य उमेदवार ठरले आहेत. या 9 जणांच्या यादीत शरद पवारांनी (Sharad Pawar) सरप्राईज नावं दिली आहेत. यात वर्धा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अमर काळेंच्या (Amar Kale) नावावर शिक्कामोर्तब केला गेलाय. या उमेदवारीबाबत काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी स्वत: दुजोरा दिला आहे. तसेच लवकरच आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची तुतारी हाती घेणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहे.
अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब
वर्धा लोकसभेची उमेदवारी महाविकास आघाडीकडून आपल्याला मिळाली याबाबत काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी दुजोरा दिला आहे. नुकतेच ते वर्धा येथे पोहचल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना याबाबत माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या संमतीने प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. भाजपच्या हुकूमशाही वृत्तीला शह देण्यासाठी आपण रिंगणात उतरलो आहोत. सध्या ही यादी संभाव्य यादी आहे, पण मी काँग्रेस पक्षाच्या संमतीने तुतारी चिन्हावर लढण्यासाठी सज्ज झालो असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
काँग्रेसच्या सभेसाठी गेलो अन् हाती तुतारी घेऊन आलो
इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढविणार आहे. देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी आपले लोकसभा हे टार्गेट असून माझं नाव जवळ जवळ कन्फर्म झाले आहे. केवळ औपचारिक घोषणा तेवढी व्हायची बाकी आहे. नुकतीच शरद पवार यांच्यासोबत लोकसभा या विषयावर आमची सकारात्मक चर्चा झाली असून तुतारी चिन्हावर लढण्यास आता कार्यकर्ते देखील आग्रही आहे. राहुल गांधी यांच्या काँग्रेसच्या सभेसाठी मी मुंबईला गेलो आणि परततांना मात्र तुतारी हाती घेऊन आल्याची प्रतिक्रिया अमर काळे यांनी बोलताना दिली.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीत ठरल्याप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे, माढ्यातून महादेव जानकर, साताऱ्यातून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील हे उमदेवार असतील. तर तिकडे शिरुरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, बीडमध्ये बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे हे उमेदवार असू शकतात.
महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघात कराळे मास्तर म्हणजेच नितेश कराळे (Nitesh Karale) यांच्या एवजी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसकडे होता. मात्र यंदा हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला येथे संधी मिळाली आहे. त्यामुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)