एक्स्प्लोर

Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी शरद पवार गटाचं ठरलं! वर्ध्यातून कराळे मास्तरांच्या ऐवजी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब? 

NCP Lok Sabha candidate list : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी पहिले 9 संभाव्य उमेदवार ठरले आहेत. यात विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघात कराळे मास्तर ऐवजी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मुंबई : शरद पवारांच्या (Sharad Pawar NCP) राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी (NCP Lok Sabha candidate list)  पहिले 9 संभाव्य उमेदवार ठरले आहेत. या 9 जणांच्या यादीत शरद पवारांनी (Sharad Pawar) सरप्राईज नावं दिली आहेत. यात बारामतीत ठरल्याप्रमाणे खासदार सुप्रिया सुळे, माढ्यातून महादेव जानकर, साताऱ्यातून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील किंवा श्रीनिवास पाटील हे उमदेवार असतील. तर तिकडे शिरुरमधून अमोल कोल्हे, नगर दक्षिणमधून निलेश लंके, बीडमध्ये बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेटे हे उमेदवार असू शकतात. 

महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघात कराळे मास्तर म्हणजेच नितेश कराळे (Nitesh Karale) यांच्या एवजी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची अधिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. नुकतीच हातीआलेल्या यादीनुसार वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी आमदार अमर काळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे.

हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसकडे होता. मात्र यंदा हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला येथे संधी मिळाली आहे. त्यामुळे वर्धा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी देण्याची तयारी पक्षाने केली आहे.

वर्ध्यातून कराळे मास्तरांच्या एवजी अमर काळेंना संधी?

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच निवडणुका लढवण्याऱ्यांची देखील संख्या वाढतांना पाहायला मिळत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेले नितेश कराळे म्हणजेच कराळे मास्तरांनी देखील लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. शरद पवार आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असल्यास मी वर्धा लोकसभा मतदारसंघातून  निवडणूक लढवणार असल्याचे कराळे गुरुजी म्हणाले होते. 

पहिले 9 संभाव्य उमेदवार ठरले

दरम्यान यावेळी बोलतांना कराळे गुरुजी म्हणाले होते की, “मी मागे काही भेटी घेतल्या. पवार साहेबांचा आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर मी वर्धामध्ये लोकसभा निवडणूक नक्की लढवेल. स्थानिक पातळीवर मला मोठा पाठिंबा आहे. प्रचंड मताने मी विजयी होऊ शकतो, हाच निरोप मी आज शरद पवारांकडे घेऊन आलो होतो. महाविकास आघाडीमधल्या कुठल्या ही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढवू शकतो. पवार साहेब माझ्याबाबत सकारात्मक असल्याचे" कराळे म्हणाले आहेत. मात्र नुकतेच शरद पवारांनी जाहीर केलेल्या संभाव्य उमेदवारांमध्ये नितेश कराळे (Nitesh Karale) यांच्या एवजी अमर काळेंना संधी दिल्याचे बघायला मिळत आहे. असे असले तरी या नावावर शिक्कामोर्तब न झाल्याने याबाबत अद्याप तरी सुनिश्चिती नसल्याचेही बोलले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget