एक्स्प्लोर

Sharad Pawar : साखर कामगारांचे नेमके प्रश्न काय? त्रिसदस्यीय कमिटी स्थापन करण्याची शरद पवारांची सूचना  

साखर कामगारांना बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावर ताबडतोब एक राज्यस्तरीय त्रिसदस्यीय कमिटी स्थापन करण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्या आहेत.

Sharad Pawar : राज्यातील अडचणीत सापडलेले साखर कारखाने व त्यामुळं अडचणींत आलेले साखर कामगारांना बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावर ताबडतोब एक राज्यस्तरीय त्रिसदस्यीय कमिटी स्थापन करण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी दिल्या आहेत.  त्या कमिटीनं 30 दिवसात अभ्यास करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश या कमिटीला दिले जातील अशी ग्वाही देखील पवार यांनी दिली. इस्लामपूर येथील राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्यावर साखर कामगारांचा भव्य मेळावा पार पडला, यावेळी पवार बोलत होते. 

सध्या राज्यातील अनेक साखर कारखाने अडचणीत आहेत. त्यांना अडचणीतून बाहेर काढणे गरजेचे आहे.  अडचणीत सापडलेले साखर कारखाने व त्यामुळे अडचणीत आलेले साखर कामगार यांना बाहेर काढण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी संघटना ही महाराष्ट्रातील अत्यंत विधायक अशी संस्था आहे. अनेकदा मतभेद झाले, वादावादी झाली तरी ते कुठपर्यंत न्यायचं याचं तारतम्य संघटनेने ठेवले आहे. भांडण केले, तरी प्रश्न सोडवून घेतले. त्याचे कारण संघटनेमध्ये नेतृत्वाची मालिका होती असेही पवार म्हणाले. यावेळी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासह महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले उपस्थित होते.

साखर कामगारांचे प्रलंबित प्रश्न काय आहेत

1) साखर कामगारांचे थकित वेतन त्वरीत देण्यात यावेत.
2) साखर कामगारांच्या पगारवाढी बाबतचे करार व त्यांची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी.
3) कामगारांच्या पेन्शन वाढीसाठी शरद पवार यांनी लक्ष घालून पेन्शन वाढीसाठी मदत करावी.
4) कायम कामगार सेवा निवृत्त होताना त्याला मिळणारऱ्या ग्र्यॅज्युटी रक्कमेत वाढ करण्यात यावी म्हणजेच एक वर्षाला कायम कामगारांना पंधरा दिवसा ऐवजी एक महिन्याच्या पगार व हंगामी कामगारांना सात दिवसा ऐवजी पंधरा दिवसांचा पगार ग्र्यॅज्युटी म्हणून देण्यात यावा.
5) अनाठायी नोकरी भरती टाळण्यासाठी आकृतीबंध तयार करुन, पगारामध्ये नियमितता आणण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फतच अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.

या प्रमुख मागण्या साखर कामगारांच्या मेळाव्यात करण्यात आल्या आहेत. आता या मागण्या मंजूर होणार का? आणि साखर कामगारांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
धर्मांतर विधेयक मुस्लिम विरोधात? विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्र्याचं उत्तर, फडणवीसांनी सांगितलं नेमकं काय?
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग

व्हिडीओ

Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?
Eknath Shinde on BDD : लोढा बांधतात त्या दर्जाचीच BDD ची घरं, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
जात अन् धर्मापोटी डोकेफोड, बीडमधून मराठमोळ्या अभिनेत्याचं आवाहन; म्हणाला, 'एकमेकांची डोकी फोडण्यापेक्षा...'
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
आम्हाला तुटपुंजे मानधन, निदान उपसरपंचाएवढे तरी द्या; नगरसेवकाचं मुख्यमंत्र्याचं पत्र, सांगितलं किती मिळतो भत्ता?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाची नकारघंटा, अमेरिकेच्या अडचणी वाढल्या
होर्मुझमध्ये युद्धनौका पाठवण्यास जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलियाचा नकार,ट्रम्प यांना मोठा धक्का
Naigaon BDD Chawl Photo: 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुट...गायकवाड, कदम, शेख, जाधव...; नायगाव बीडीडी चाळीत मराठी माणसाला हक्काचं घर, पाहा PHOTO
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
बीडमधील महिला अत्याचारप्रकरणात ट्विस्ट; पीडितेच्या पतीवरही गुन्हा दाखल, पोलीस कारवाईला वेग
Adinath Maharaj Ahilyanagar Crime: रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ महाराजांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
2000 ते 5 हजार घेऊन विधानसभेचे एन्ट्री पास दिले; उदय सामंतांची सभापतींकडे तक्रार, खोट्या लेटरपॅडचा वापर
Embed widget