(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देवेंद्र फडणवीसांमध्ये हिम्मत असेल तर न्यायमुर्ती चांदीवाल चौकशी अहवाल लोकांसमोर आणावा; अनिल देशमुख यांचे खुले आव्हान
Anil Deshmukh On Devendra Fadnavis : दहशवाद आणि 2 खुनाच्या गुन्हातील अरोपीच्या कुबडयावर राजकीय सूडबुद्धीने देवेंद्र फडणविस यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आलीय, असा घणाघात अनिल देशमुख यांनी केलाय.
Anil Deshmukh On Sachin Waze नागपूर : माझ्यावरील 3 वर्षापुर्वी परमविर सिंग आणि सचिन वाझे (Sachin vaze) याने माझ्यावर केलेल्या आरोपावर न्यायमुर्ती चांदीवाल यांनी 11 महीने चौकशी केली. या चौकशी दरम्यान दहशतवादी आणि दोन खुनाच्या गुन्हातील आरोपी सचिन वाझे यांनी उलट चौकशीत कोर्टामध्ये स्पष्ट पणे सांगीतले होते की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पि.ए. ने मला पैसे मागीतले नाही आणि मी त्यांना कधी पैसे दिले नाही. दहशवाद आणि 2 खुनाच्या गुन्हातील अरोपीच्या कुबडयावर राजकीय सूडबुद्धीने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavi) यांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आलीय, असा घणाघात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला आहे.
मला “क्लिन चिट” दिल्यामुळे तो अहवाल दडवून ठेवला- अनिल देशमुख
पुढे बोलतांना अनिल देशमुख यांनी सांगीतले की, न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या कोर्टाने माजी पोलीस आयुक्त परमविर सिंग यांना सुध्दा कोर्टात बोलविले होते. परंतु सहा वेळा समन्स पाठवुन सुध्दा ते आले नाही. शेवटी त्यांचा पकड वॉरंट काढल्यावर त्यांनी वकीलाच्या मार्फत कोर्टात शपथपत्र लिहुन दिले की, मी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले ते एैकीव माहितीवर केले आणि त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही. न्यायमुर्ती चांदीवाल यांनी माझ्यावरील आरोपाच्या चौकशीचा 1400 पानांचा अहवाल हा राज्य सरकारकडे 2 वर्षापुर्वी सादर केला आहे. परंतु दोन वर्षापासुन तो अहवाल राज्य सरकार लोकांसमोर आणीत नाही. यासाठी मी अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन न्यायमुर्ती चांदीवाल यांचा अहवाल सार्वजनीक करण्यासाठी विनंती केली.
दोन वर्षापुर्वी हा अहवाल राज्य शासनाला सादर झाला त्यावेळी सर्वच वर्तमान पत्रामध्ये अनिल देशमुख यांना न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या अहवालात “क्लिन चिट” दिल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु या अहवालात मला “क्लिन चिट” दिल्यामुळे तो अहवाल देवेंद्र फडणविस यांनी दडवून ठेवला आहे, असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
राजकीय सूडबुद्धीने देवेंद्र फडणवीसांचे माझ्यावर आरोप- अनिल देशमुख
दहशतवादी आणि दोन खुनाच्या गुन्हातील आरोपी सचिन वाझे आता देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन माझ्यावर जुनाच 3 वर्षापुर्वीचा आरोप करीत आहे. काल सांगीतल्याप्रमाणे मला जामीन देतांना उच्च न्यायालयाने स्पष्ट पणे सांगीतले की, सचिन वाझे हा 2 खुनाच्या गुन्हाच्या आरोपात असल्यामुळे व तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या कोर्टात माझ्या वकीलांनी जेव्हा त्याची उलट चौकशी केली तेव्हा त्याने स्पष्ट सांगीतले की, अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पी.ए.ने व कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यांनी पैसे मागीतले नाही किंवा मी दिले नाही. देवेंद्र फडणवीस यांची हिंमत असेल तर 3 वर्षापुर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्यायमुर्ती चांदीवाल यांच्या कोर्टाने शासना सादर केलेला चौकशी अहवाल लोकांसमोर आणावा, असे आवाहनही अनिल देशमुख यांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या