एक्स्प्लोर

कोरोनाची दुसरी लाट घातक, कोरोनाच्या लक्षणातही बदल; जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची माहिती

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांची लक्षणं पाहता अनेक जण त्याकडे टायफॉईड म्हणून पाहत आहेत.मात्र सध्या टायफॉईडची कोणतीही साथ सुरू नसून अशा प्रकारची कोणतीही लक्षणे आढळली तर  तातडीने कोरोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कोरोनाच्या लक्षणात अनेक बदल दिसून येत असल्याने उपचार करताना अनेक अडचणी समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेतील  कोरोना अधिक घातक ठरत असल्याने कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असा सल्ला जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिला आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळेस कोरोनाच्या प्रारंभिक लक्षणात सर्दी, ताप, खोकला आला की कोरोनाची ही प्रमुख लक्षणे मानली जायची. आणि त्यानुसार चाचणी करून डॉक्टर उपचार करत असत. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या विषाणूंमध्ये अनेक बदल दिसून येत आहेत. त्यानुसार रुग्णांना विविध प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी,अशक्तपणा, जुलाब, चव जाणे, डोकेदुखी इत्यादी प्रकारची नवी लक्षणे दिसून येत आहेत.  त्यामुळे उपचार करणाऱ्या यंत्रणेला या नव्या लक्षणांशी जुळवून घेत उपचार करणे काहीसे अवघड जात आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आढळून येत असलेल्या रुग्णांचा विचार केला तर सुरुवातीच्या दोन तीन दिवस चांगला असलेला पेशंट अचानक सीरियस होत असल्याचं आणि तो पेशंट मृत्यूकडे जात असल्याच समोर आले आहे. हीच गोष्ट जास्त घातक ठरत असल्याने आपण काळजी घ्यायला हवी, असं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटलं.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णांची लक्षणं पाहता अनेक जण त्याकडे टायफॉईड म्हणून पाहत आहेत. यामध्ये चार पाच दिवसांनंतर रुग्ण गंभीर होत असल्याचं निदर्शनात आलं आहे. सध्या टायफॉईडची कोणतीही साथ सुरू नसून अशा प्रकारची कोणतीही लक्षणे आढळली तर  तातडीने कोरोनाची चाचणी करून घ्या. निदान होताच लागलीच उपचार करून घेणे महत्त्वाचे आहे, असं अभिजीत राऊत यांनी म्हटलं.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा प्रसार हा वेगाने होतांना दिसून येत आहे. पहिल्या लाटेच्या वेळी एकाच दिवशी 1223 इतक्या रुग्णांची एकाच दिवशी नोंद करण्यात आली होती. ती आता मागे पडली असून 1600 च्या वर रुग्ण हे एकाच दिवसात आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचं आहे, असं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
Milind Deora : काँग्रेस काय आहे मला चांगलं माहिती; शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही; मिलिंद देवरांचे वक्तव्य
काँग्रेस काय आहे मला चांगलं माहिती; शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही : मिलिंद देवरा
CSK vs LSG IPL 2024: धोनीने धुतलं, पण कुठे चुकलं?; चेन्नईच्या पराभवामागील नेमकं कारण काय?, पाहा
धोनीने धुतलं, पण कुठे चुकलं?; चेन्नईच्या पराभवामागील नेमकं कारण काय?, पाहा
VIDEO : ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Salman Khan Threat Call : लाॅरेन्स बिश्नोईचं नाव वापरून आणखी एक खोडसाळपणाABP Majha Headlines : 11 AM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादाचा;त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू -संजय राऊतYavatmal Loksabha Election : प्रचारासाठी लोककला ठरतेय प्रभावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादांचा; राऊतांनी सांगितलं, सांगलीत 2 दिवसांत काय होणार
Milind Deora : काँग्रेस काय आहे मला चांगलं माहिती; शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही; मिलिंद देवरांचे वक्तव्य
काँग्रेस काय आहे मला चांगलं माहिती; शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही : मिलिंद देवरा
CSK vs LSG IPL 2024: धोनीने धुतलं, पण कुठे चुकलं?; चेन्नईच्या पराभवामागील नेमकं कारण काय?, पाहा
धोनीने धुतलं, पण कुठे चुकलं?; चेन्नईच्या पराभवामागील नेमकं कारण काय?, पाहा
VIDEO : ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
ट्रम्प यांच्या हश मनी प्रकरणावर सुनावणी, कोर्टाबाहेर व्यक्तीने स्वत:ला पेटवलं
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
माढ्याचा तिढा सुटल्यानंतर उत्तम जानकरांना शरद पवारांचं पहिलं गिफ्ट; विधानसभेची उमेदवारी जाहीर
Bachchan Family Net Worth : गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती
गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती
Social Media Report Card : युट्यूबवर राहुल गांधींना सर्वाधिक पसंती; पीएम मोदींचे Youtube चॅनेल चौथ्या क्रमांकावर
युट्यूबवर राहुल गांधींना सर्वाधिक पसंती; पीएम मोदींचे Youtube चॅनेल चौथ्या क्रमांकावर
Uddhav Thackeray : फडणवीस म्हणाले होते, आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी ग्रूम करतो, मी दिल्लीला जातो, उद्धव  ठाकरेंचा दावा
फडणवीस म्हणाले होते, आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी ग्रूम करतो, मी दिल्लीला जातो, उद्धव ठाकरेंचा दावा
Embed widget