संच मान्यतेसाठी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाणार
Sanch Manyata : संच मान्यतेसाठी (Sanch Manyata) विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध करत असताना अडचणी येत होत्या. त्यामुळं आता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाणार आहे.
Sanch Manyata : राज्यातील शाळांमध्ये संच मान्यतेसाठी (Sanch Manyata) विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध करत असताना अडचणी येत होत्या. त्यामुळं आता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाणार आहे. संच मान्यतेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या आणि शिक्षकांची संख्या अवलंबून असते. त्यामुळं अतिरिक्त शिक्षक ठरु नये यासाठी योग्य पद्धतीने संच मान्यता होणे आवश्यक आहे.
शिक्षकांना आता या प्रत्यक्ष पडताळणीमुळे काहीसा दिलासा मिळणार
15 जून 2023 पर्यंत आधार कार्ड वैध असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार संच मान्यतेमध्ये करण्यात येणार आहे. 2022-23 संच मान्यता अंतिम करण्यात येईल, अशा प्रकारे परिपत्रकात सूचना शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. पटावर असलेल्या परंतु आधार अवैध असलेल्या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करून त्यांना संचमान्यतेमध्ये विचारात घेण्यासाठी शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. 80 टक्के विद्यार्थ्यांचे आधार वैध असल्याचा विचार करुन आतापर्यंत त्यांची मान्यता अंतिम करण्यात येत आहे. आता ज्या विद्यार्थ्यांकडे अद्याप आधार कार्ड नाहीत, नावात तफावत आहे किंवा अन्य कारणामुळे विद्यार्थी अवैध ठरत असतील त्यांची यादी करुन त्या त्या तालुक्यांच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी अर्ज करून पाठवायचे आहेत. शिवाय, अशा विद्यार्थ्यांना संच मान्यतेमध्ये वैध ठरवण्यासाठी महत्त्वाचे सूचना विभागाकडून देण्यात येत आहेत. त्यामुळे आधार कार्ड वैध करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडचणी येत असलेल्या शिक्षकांना आता या प्रत्यक्ष पडताळणीमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे. शिवाय आता अधिकाधिक विद्यार्थी संच मान्यता अंतिम करत असताना वैध ठरणार आहेत.
.