एक्स्प्लोर

नांदेडमध्ये साजरा करण्यात आला शाळेचा वाढदिवस, विविध कार्यक्रमाचे आयोजन 

शाळेची स्थापना 31 डिसेंबर 1989ची, आपल्या शाळेचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना जेव्हा येथील मुख्याध्यापकांनी मांडली, तेंव्हा गावकऱ्यांनी त्यास प्रतिसाद दिला

School Anniversary Celebration  : आपण मुलांचे, प्राण्यांचे,वास्तूंचे व  विविध उपक्रमातुन अनेकदा विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे केल्याचे आपल्या ऐकिवात असेल, पण नव्याने अर्धापूर तालुक्यात समाविष्ट झालेल्या देशमुखवाडी या गावात गावकरी शिक्षक व विद्यार्थींनी मिळून, चक्क शाळेचा वाढदिवस साजरा केलाय". अर्धापूर तालुक्यातील चोरंबा (नां) गावाच्या ग्रामपंचायत अंतर्गत येणारे डोंगरात वसलेले संपूर्ण आदिवासी वस्ती असलेले गाव देशमुखवाडी या गावात चौथीपर्यंत शाळा आहे. शाळेची स्थापना 31 डिसेंबर 1989ची, आपल्या शाळेचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना जेव्हा येथील मुख्याध्यापक सुनिल धोबे यांनी मांडली, तेंव्हा गावकऱ्यांनी त्यास प्रतिसाद दिला. दि.31डिसेंबर शुक्रवारी रोजी या वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा दिवस आनंदाने साजरा करण्यात आलाय . 
 
शाळा वाढदिवसाच्या निमित्ताने वर्ग सजावट करण्यात आली . संपुर्ण शाळेला फुलांच्या तोरणांनी सजविण्यात आले. रांगोळ्या काढून फुलांची सजावट करुन परिसर आनंददायी करण्यात आला . गावकऱ्यांनी यात मोलाची साथ दिली . याप्रसंगी शेजारच्या सायलवाडी, मोठा तांडा येथील ही विद्यार्थी सहभागी झाले. कविता, गीत गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी निमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख ग.ई. कांबळे उपस्थित होते तर गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व या नवीन उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी प्रा.शा. चाभरा शाळेचे पदोन्नत मुख्याध्यापक चंद्रकांत दामेकर होते . 

या प्रसंगी बोलताना दामेकर म्हणाले की चांगल्या उपक्रमात गावकऱ्यांनी हिरीरीने भाग घेतला पाहिजे व चांगल्या कामात एकजूट दाखवून दिली पाहिजे . मुलांना मोठी स्वप्ने दाखवा . बुद्धीमत्ता ग्रामीण भागातील मुलांतही भरपूर आहे त्याला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे . शिक्षण हीच सध्याच्या काळातील खरी गुंतवणुक आहे.  केंद्रप्रमुख ग.ई. कांबळे आपल्या भाषणात म्हणाले की गावकऱ्यांच्या मदतीने शाळा उत्तम व्हावी व शाळा उत्तम झाली म्हणजे पर्यायाने गाव उत्तम होते . 

कार्यक्रमास या परिसरातील इतर जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक  ही उपस्थित होते. त्याच प्रमाणे या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण होते व आपल्या शाळेबद्लची त्यांची आपुलकी वाढवणारा हा कार्यक्रम ठरलाय. या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व गावातील महिला, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थिती होते .

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण आधी साताऱ्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य  
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण आधी साताऱ्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य  
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! मतदान कुणाला केलं हे कळणार अशी मतदारांना दमबाजी सुरु, खासदार मोहिते पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक! मतदान कुणाला केलं हे कळणार अशी मतदारांना दमबाजी सुरु, खासदार मोहिते पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप
Rohit Pawar : आंदोलन करताना पक्षाचं चिन्ह का वापरत नाही? पक्षापासून फारकत घेताय का? रोहित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली
आंदोलन करताना पक्षाचं चिन्ह का वापरत नाही? पक्षापासून फारकत घेताय का? रोहित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली

व्हिडीओ

Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Beed Leopard vs dog: आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
आधी बिबट्यांनी श्वानाच्या पिलाला मारलं, मग श्वानानं घेतला बिबट्याच्या पिलाचा जीव, बीडमध्ये नेमकं काय घडलं?
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
Ramdas Athawale on Sharad Pawar : 2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
2019 मध्ये शरद पवार एनडीएसोबत आले असते तर 2022 ला देशाचे राष्ट्रपती झाले असते; रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
BJP-SAD Alliance Punjab : मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
मोठी बातमी : पंजाबमध्ये विभागलेले जुने मित्र पुन्हा एकत्र, भाजप-अकाली दलाची युती, अमित शाहा म्हणाले, जुन्या मित्राचं स्वागत!
Solapur Election News: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे घडामोडींना वेग; आरोप अन् प्रत्यारोप; पुन्हा गोरे विरुद्ध मोहिते पाटील टोलेबाजी, नेमकं काय घडलं?
Embed widget