एक्स्प्लोर

साताऱ्यात पेट्रोलची पाईपलाईन फोडली, परिसरात पेट्रोलनं विहिरी तुडुंब भरल्या, पिकं जळाली

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सासवड येथील गावात पेट्रोलची पाईपलाईनच फोडल्याचं समोर आलंय.पेट्रोल हे जमिनीत मुरल्यामुळे आता परिसरातील सर्वच विहिरी सध्या पेट्रोलने तुडूंब भरल्या आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यातील सासवड गावातील एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सासवड येथील गावात पेट्रोलची पाईपलाईनच फोडल्याचं समोर आलंय. एका बाजूला पॅट्रोलचे दर गगनाला भिडले असताना दुसरीकडे मात्र चोरट्यांनी अशा पद्धतीने केलेली चोरी म्हणजे सातारा पोलिसांना दिलेले मोठे आव्हानच म्हणावे लागणार आहे. साताऱ्यातील सासवड येथे आठ दिवसांपूर्वीची ही घटना आता समोर आली असून ही घटणेचे गांभीर्य लक्षात घेतो ती गोपनीय ठेवण्यात आली होती.

हिंदुस्तान पॅट्रोल लिमिटेडने मुंबंई ते सोलापूर अशी पेट्रोलची पाईपलाईन केली आहे. ही पाईपलाईन साताऱ्यातील फलटण तालुक्यातील सासवड आदर्की अशा डोंगराळ भागातून नेण्यात आली आहे. ही पाईपलाईन आज्ञात चोरट्यांनी ड्रील करुन त्याला पाईप लावून ती बाहेर काढली. चोरट्यांनी हजारो लिटर पेट्रोल चोरुन नेले. चोरट्यांनी पेट्रोल चोरी केली मात्र ही चोरी करत असताना त्यांना काढलेली पाईप पुन्हा जोडता आली नाही.

 परिसरात पेट्रोलचा वास

त्यामुळे त्यातून हजारो लिटर पॅट्रोल हे परिसरात मुरत गेले. आणि या परिसरातील संपूर्ण शेती ही जळून गेली. परिसरात पेट्रोलचा वास येत होता मात्र तो नेमका कुठून येतो हे शेतकऱ्यांना समजले नाही. परिसरातील लोकांना मात्र या वासाचा मोठा त्रास जाणवत असताना हिंदुस्तान पेट्रोलियमचे कर्मचारी अधिकारीही शोध घेत या परिसरात फिरत होते. अखेर त्यांना ज्या ठिकाणी ही चोरी झाली आहे ते ठिकाण मिळून आले. जेव्हा पाहिले तेव्हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल वाया चालल्याचे निदर्शनास आले. त्यांनी वेळीच पोलिसांना या बाबतची माहिती देत संपूर्ण परिसराला धोकादायक परिसर म्हणून सील केले.

साताऱ्यात पेट्रोलची पाईपलाईन फोडली, परिसरात पेट्रोलनं विहिरी तुडुंब भरल्या, पिकं जळाली

परिसरातील विहिरी सध्या पेट्रोलने तुडूंब भरल्या दरम्यान या ठिकाणी सुमारे सात ते आठ पाण्याचे टँकर, गळती झालेले पेट्रोल गोळा करण्यासाठी पॉवर ट्रॅकरही मागवण्यात आले. तसेच या संपूर्ण परिसरात मोबाईल वापरासह कुणी शेकोटी करु नये, परिसराला वनवा लावू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त लावला. ही झालेली गळती सध्या पूर्णता थांबवण्यात हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना यश आले असले तरी या हजारो लिटर पेट्रोल हे जमिनीत मुरल्यामुळे आता परिसरातील सर्वच विहिरी सध्या पेट्रोलने तुडूंब भरल्या आहेत. यातील पाण्यासह पेट्रोल टॅंकर लावून काढण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्व विहिरीतील उपसा सुरु असला तरी यात पेट्रोल जमा होण्याचे प्रमाण काही अद्याप थांबलेले नाही. या विहिरींमधील मासेही मृत होऊन ते विहिरीवरच तरंगताना दिसत आहेत. विहिरीत मोठ्या प्रमाणात पंट्रोल साठत असल्यामुळे या विहिरींमधील पाणी हे पिण्यालायक राहिलेलं नाही.

साताऱ्यात पेट्रोलची पाईपलाईन फोडली, परिसरात पेट्रोलनं विहिरी तुडुंब भरल्या, पिकं जळाली

शेतकऱ्यांची पिके जळून गेली 

त्याचबरोबर संपूर्ण शेतीही पेट्रोलने भिजल्यामुळे या परिसरातील असंख्य शेतकऱ्यांची पिके ही जळून गेली आहेत. यात गहु, बाजरी, मका या सारख्या पिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी आता येथील शेतकऱ्यांनी केलीय. या बाबत हिदुस्तान पॅट्रोलियमने लोणंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञातांविरोधात चोरीचा आणि नुकसान केल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ दिवसात या घटनेबाबत अद्याप पोलिस कोणालाही पकडू शकलेले नाही. मात्र या चोरीवर एक टीम काम करत असल्याचे जिल्हा पोलिस प्रमुख अजय कुमार बन्सल यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Nagpur : दोन दिवसांनंतर अजित पवार आज सभागृहात जाणारAmol Mitkari Nagpur : अजित पवार आणि शशिकांत शिंदेंच्या भेटीवर अमोल मिटकरी काय म्हणाले?Suresh Dhas Meet Ajit Pawar:त्या 6-7 जणांचा आका कोण आहे? त्या आकांचा आका कोण?धस यांचा निशाणा कुणावर?MVA Government : मविआ काळात फडणवीस, शिंदेंना अटक करण्याच्या कटाचा तपास SIT मार्फत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravi Ashwin : वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
वेळ, मैदान, जागा अन् धक्का सुद्धा तोच! जे 10 दहा वर्षांपूर्वी धोनीनं केलं तेच आश्विननं शांततेत केलं! त्या योगायोगाची रंगली चर्चा
Ravichandran Ashwin : अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
अश्विनचा कसोटी क्रिकेटमधील भीम पराक्रम जो आजवर भारतातील रथी महारथींना सुद्धा गाठता आला नाही!
R Ashwin : आर. अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
अश्विनकडून निवृत्तीच्या निर्णयावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी, भारताचा स्टार फिरकीपटू भावूक
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
मोठी बातमी! शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
छगन भुजबळांच्या आक्रमक पवित्र्यावर अजित पवार बोललेच नाहीत, तटकरे म्हणाले, योग्यवेळी भेट घेऊ, राष्ट्रवादीत चाललंय काय?
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
कॅन्सरग्रस्त 70 वर्षीय शेतकरी नेते जगजित सिंह डल्लेवाल गेल्या 23 दिवसांपासून फक्त पाण्यावर, शरीरातील अनेक अवयव निकामी होण्याची भीती
Astrology : यंदाची संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
संकष्टी चतुर्थी 3 राशींसाठी ठरणार खास; 18 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Video : ट्रॅव्हिस हेडचं स्वस्तात 'हेडॅक' संपलं अन् प्रेक्षक गॅलरीमधील छोट्या चाहत्यांच्या 'अंगात' सिराज संचारला! हुबेहुब तसेच हातवारे
Embed widget