एका दिवसात 2 अधिकारी निलंबित होत असतील तर गेल्या 3 महिन्यात काय घडलं असेल? धनंजय देशमुखांचा सवाल
एका दिवसात जर दोन अधिकारी निलंबित होत असतील तर गेल्या तीन महिन्यात जेलमध्ये काय घडलं असेल असे मत धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी व्यक्त केले.

बीड : एका दिवसात जर दोन अधिकारी निलंबित होत असतील तर गेल्या तीन महिन्यात जेलमध्ये काय घडलं असेल असे मत धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी व्यक्त केले. आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवावं असे धनंजय देशमुख म्हणाले. कालच कारागृह वरिष्ठ अधिकारी डी. डी. कवाळे आणि कर्मचारी सीमा गोरे यांचं निलंबन करण्यात आलं आहे.
वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील मारेकऱ्यांशी नातेवाईकांच्या व्यतिरिक्त लोकांना भेटू दिल्याने आणि अनेक त्रुटी आढळून आल्याने निलंबनाची कारवाई केली आहे. आता तरी आमची जी मागणी आहे. जो आमचा अर्ज आहे त्यावर गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे असे देशमुख म्हणाले. आरोपींना जेलमध्ये सुविधा पुरवल्या गेल्या हे 100 टक्के खरं आहे. आम्ही गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सांगतोय बीड जेलमध्ये काय चालू आहे असे देशमुख म्हणाले. तुम्ही एका दिवसात येऊन जर दोन अधिकाऱ्यांना निलंबित करु शकता. तर मागच्या तीन महिन्यात ज्या घटना झालेल्या आहेत त्या काय घडल्या असतील आणि त्याला जिम्मेदार कोण? असा सवालही देशमुख यांनी केला.
आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवावं, पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्रालयाला अर्ज करणार
आरोपींना वेगवेगळ्या जेलमध्ये ठेवावं यासाठी आम्ही अर्ज करणार आहोत. त्यावर गृह मंत्रालयाने गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. शक्यतो उद्याच पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्रालयाला अर्ज करणार असल्याचे देशमुख म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी


















