एक्स्प्लोर
फेरीवाल्यांवर कारवाई करा, पण सर्वसामान्यांचा गळा का पकडता?
ठाणे: ठाण्यात काल महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचा रुद्रावतार पाहायला मिळाला.
ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना फेरीवाल्यांकडून मारहाण झाल्यानंतर, स्वतः आयुक्त संजीव जयस्वाल कारवाईसाठी रस्त्यावर उतरले.
यावेळी ठाणेकरांना संजीव जयस्वाल यांचा आक्रमकपणा पाहायला मिळाला. संजीव जयस्वाल यांच्यासोबत बॉडीगार्ड आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.
उपायुक्त संदीप माळवी यांना झालेल्या मारहाणीचा राग, संजीव जयस्वाल यांनी फेरीवाल्यांवर न काढता, सर्वसामान्यांवरच काढल्याचं पाहायला मिळालं.
अनधिकृत कार पार्किंग केलेल्या एका मुलाला आयुक्तांनी गळा पकडून मारले. तो विनावण्या करित होता की एकदा तरी माझे ऐका, तरी आयुक्तांनी ऐकले नाही, त्याची आई सोबत होती तिलादेखील धक्काबुक्की झाली.
कारवाईदरम्यानच्या दृश्यांमध्ये संजीव जयस्वाल यांनी त्या तरुणाचा गळा पकडल्याचं स्पष्ट दिसतंय.
दुसऱ्या एका व्हिडीओत आयुक्तांनी रिक्षाचालकाला बाहेर ओढून त्याची कॉलर पकडल्याचं दिसतं. त्यानंतर आयुक्तांच्या बॉडीगार्ड्सने रिक्षाचालकाला बेदम मारहाण करुन हटकलं.
गुन्हा अवैध फेरिवाल्यांनी केला आहे, मग त्याची शिक्षा सर्वसामान्यांना का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. याशिवाय काही रिक्षावालेही मग्रूर असतात, त्याचा अनुभव ठाण्यासह बहुतेक शहरात येतोच. मात्र त्यांच्यावरील कारवाईसाठीही वेगळी सक्षम यंत्रणा आहे.
दुसरीकडे उपायुक्त संदीप माळवी यांना फेरीवाल्यांकडून झालेली मारहाण चुकीचीच आहे, मात्र त्याबदल्यात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्याचा राग रिक्षाचालक किंवा सर्वसामान्यांवर काढणेही त्यापेक्षा जास्त चुकीचं आहे.
अवैध फेरीवाल्यांवर नियमानुसार कारवाई व्हायलाच हवी, मात्र आयुक्तांनी त्या कारवाईत सर्वसामान्यांचाच गळा पकडणं हे अत्यंत निषेधार्ह आहे.
आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याने नागरिकांना कायद्याचे वाटेवर चालण्याचे धडे देणे अपेक्षित आहे. मात्र फेरीवाल्यांच्या नावाने सर्वसामान्यांवर कारवाई कितपत योग्य आहे?
संबंधित बातम्या :
उपायुक्तांना मारहाणीनंतर ठाणे पालिका आयुक्त जयस्वाल आक्रमक
ठाणे महापालिकेच्या उपायुक्तांना 100-150 फेरीवाल्यांकडून जबर मारहाण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement