एक्स्प्लोर

Sanjay Raut : 'इंडिया' आघाडी संपलीय? प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणतात, हे तर...

Sanjay Raut On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडी संपली असल्याचे वक्तव्य केले असताना दुसरीकडे संजय राऊत यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

Sanjay Raut :  महाविकास आघाडीच्या बैठकीत आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Amedkar) हे सहभागी झाले. प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडी संपली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आंबेडकरांचा दावा फेटाळून लावला आहे. काही ठिकाणी रणनीती म्हणून आघाडीतील पक्ष वेगळे लढणार असल्याचे  राऊत यांनी म्हटले. प्रकाश आंबेडकरांसोबत झालेल्या आजच्या बैठकीत   भाजपाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होईल, असा कोणताही निर्णय घ्यायचा नाही यावर एकमत झाले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. 

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, भाजपाला फायदा होईल, असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाऊल उचलणार नाही यावर एकमत झाले आहे. भाजपचा पराभव करणे हे एकमेव लक्ष्य आहे.देशातील वातावरण बदलण्सासाठी एकत्र राहणार.भाजपाचा पराभव करणे ही आमची प्राथमिकता असल्याचे सांगत आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे राऊत यांनी म्हटले. 

इंडिया आघाडीत फूट नाही; राऊतांचा दावा 

मविआ नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यांशी बोलताना नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यासमोरच इंडिया आघाडी संपली असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की,  इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांमध्ये जागा वाटपावरून काही मु्द्दे आहेत. पण इंडिया आघाडी फुटली नाही. काही रणनीतीनुसार निर्णय होत आहेत. त्यानुसार, पंजाब आणि बंगालमध्ये तसे निर्णय घेतले गेले आहेत. दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये जागा वाटप होणार असून पंजाबमध्ये स्वतंत्रपणे लढणार आहेत. ममता बॅनर्जी या देखील भाजपच्या पराभवासाठी कार्यरत असणार असल्याचे राऊत यांनी म्हटले. 

समान किमान कार्यक्रमासाठी समिती 

प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीत समान किमान कार्यक्रम ठरवण्याची मागणी केली होती. त्यावर संजय राऊत यांनी म्हटले की, समान किमान कार्यक्रमावर निर्णय घेण्यासाठी एका समिती गठीत करणार आहोत. प्रकाश आंबेडकर यांनी काही सूचना दिल्या होत्या. त्या सुचनांचा समावेश करून समिती गठीत करण्यात येत असल्याचे राऊत यांनी सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
इंडिया ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधू, किरण जॉर्जचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; सात्विक-चिरागची आगेकूच
इंडिया ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधू, किरण जॉर्जचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; सात्विक-चिरागची आगेकूच
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update | जखमेमुळे पॅरालिसिसचा धोका होता, सैफ अली खानवर सर्जरी करणारे डॉक्टर EXCLUSIVEABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 16 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 16 January 2025Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
इंडिया ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधू, किरण जॉर्जचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; सात्विक-चिरागची आगेकूच
इंडिया ओपन स्पर्धेत पीव्ही सिंधू, किरण जॉर्जचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश; सात्विक-चिरागची आगेकूच
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
माणुसकी असो की स्टंट, आला अंगलट; रिक्षा टोचन देणाऱ्या बसचालक अन् वाहकास 'निलंबनाचा दे धक्का'
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीचे 20 स्टार प्रचारक जाहीर; धनंजय मुंडेंना स्थान नाही, पार्थ पवारांना संधी
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Embed widget