एक्स्प्लोर
Advertisement
सीआयडी पोलीस निरीक्षकाची सांगलीत आत्महत्या
आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी प्रमोशन मिळत नसल्याच्या नैराशेतून आत्महत्येचा प्रकार झाला असल्याची चर्चा आहे.
सांगली: पोलीस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. सीआयडीचे पोलीस निरीक्षक सखाहरी गडदे यांनी सर्व्हिस रिवॉल्व्हरने गोळी झाडून आयुष्य संपवलं.
गडदे यांच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असले तरी प्रमोशन मिळत नसल्याच्या नैराशेतून आत्महत्येचा प्रकार झाला असल्याची चर्चा आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी गडदे यांच्या निवास स्थानी दाखल झाले.
पोलीस निरीक्षक गडदे हे 27 वर्षांपासून पोलीस दलात कार्यरत होते. सध्या ते सांगली सीआयडी मध्ये कार्यरत होते. तत्पूर्वी त्यांची तुरची मधील पोलीस प्रशिक्षण केंद्रात नेमणूक होती. त्यानंतर त्यांची सीआयडीला बदली झाली होती.
आज सकाळी त्यांनी आपल्या देवल कॉम्प्लेक्स येथील फ्लॅटमध्ये आपल्या सर्व्हिस रिवॉल्व्हर मधून स्वत:वर गोळी झाडून घेतली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
गोळीबाराचा आवाज येताच नातेवाईक धावले मात्र तोपर्यंत गडदे गतप्राण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक सखहरी गडदे यांना प्रमोशन मिळत नसल्याने ते निराश होती अशी चर्चा होती. या नैराशेतून गडदे यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असून, अधिक तपास आणि आत्महत्येचे खरे कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement