एक्स्प्लोर

Sangli Police: अडीच कोटी रुपयांच्या सोन्याच्या दरोड्याचा सांगली पोलिसांकडून 24 तासात छडा, पाच आरोपी जेरबंद

सांगली जिल्ह्यातील जत येथे गुरुवारी मध्यरात्री एका सराफाला मारहाण करत त्याच्याकडील अडीच कोटी रुपयांचे सोने लुटण्यात आलं होतं. या प्रकरणात आरोपींना अवघ्या 24 तासात अटक करण्यात सांगली पोलिसांना यश आलं आहे.

सांगली: सांगली जिल्ह्यातील जत येथे गुरुवारी मध्यरात्री एका सराफाला मारहाण करुन त्याच्याकडच्या अडीच कोटी रुपये किंमतीच्या सोन्याची लूट करण्यात आली होती. या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावण्यात सांगली पोलिसांना यश आलंय. या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सव्वा दोन कोटी रुपये किंमतीचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये सराफ व्यावसायिकाच्या एका कामगाराचा समावेश असून तोच या प्रकरणाचा मास्टर माईन्ड असल्याचे समोर आले आहे.

सांगलीच्या जत तालुक्यातील आटपाडी येथील सराफ व्यावसायिक बाळासाहेब सावंत हे सोने विक्री करण्यासाठी नांदेडला निघाले होते. मध्यरात्री दोनच्या सुमारास ते शेगाव जवळील माणेवस्ती येथे लघुशंकेसाठी गाडीतून उतरले. याचवेळी त्यांचा ओमनी गाडीतून पाठलाग करणाऱ्या पाच अज्ञात दरोडेखोरांनी व्यापारी सावंत व त्यांच्या जोडीदारास बेदम मारहाण केली. त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकण्यात आली. त्यानंतर त्याच्याकडून 2 कोटी 26 लाख 13 हजार रुपये किंमतीचे 4 किलो 530 ग्रॅम सोने लुटण्यात आले. सराफ व्यावसायिक सावंत यांच्यासोबत असणारा कामगार प्रविण चव्हाण याच्याही डोळ्यात यावेळी चटणी टाकत चार जणांनी दरोडा टाकला होता. या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भंडारा -सानगडी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत दरोडा, 32 लाखांचा ऐवज लुटला

या दरोड्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनेची दखल घेऊन सांगली पोलीस अधीक्षक गेडाम यांनी तातडीने पथके तैनात करत तपास सुरु केला होता. जत आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी याबाबत सखोल तपास करत सावंत यांचे कामगार प्रविण चव्हाण याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरु केली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत असे समोर आले की त्या कामगारानेच त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकला होता. त्यानंतर चव्हाण आणि त्याच्या चार साथीदारांनाही अटक करुन त्यांनी लुटलेले सव्वा दोन कोटी रुपयांच्या सोन्याच्या बिस्किटांसह त्यांच्या ताब्यातील रिव्हॉल्वर आणि ओमनी गाडी असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. पोलिसांच्या तीन पथकानी संयुक्तपणे ही कारवाई केलीय. याप्रकरणी प्रविण चव्हाण, विजय नांगरे, विशाल कारंडे, तात्यासाहेब गुसाळे, वैभव माने यांना अटक करण्यात आली आहे.

गुन्हा नोंद झाल्यापासून अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. या कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगली पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम यांनी 50,000/- रुपये बक्षीस जाहीर केले.

अंबरनाथमध्ये भरदिवसा ज्वेलर्स दुकानावर दरोडा, हल्लेखोरांच्या गोळीबारात 3 जखमी

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget