एक्स्प्लोर
एकतर्फी प्रेमातून नववीतील विद्यार्थिनीच्या गळ्यावर ब्लेडने वार
नववीतील विद्यार्थिनीच्या गळ्यावर ब्लेडने वार करुन आरोपीने स्वतःच्या हाताचीही नस कापून घेतली.

सांगली : एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला होण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. सांगलीमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या गळ्यावर आरोपीकडून ब्लेडने वार करण्यात आले आहेत. सांगलीतील जतमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकतर्फी प्रेमातून आरोपी तरुणाने नववीतील विद्यार्थिनीच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. त्यानंतर आरोपीने स्वतःच्या हाताचीही नस कापून घेतली. या प्रकारामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली असून आरोपी तरुणाची प्रकृतीही गंभीर आहे. दोघांना जतमधील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट























