एक्स्प्लोर
Advertisement
धनगर आरक्षणासाठी हार्दिक पटेल मैदानात उतरणार?
लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवर धनगर आरक्षणाचा मुद्दा जोर पकडत आहे.
सांगली : राज्यभरात चर्चेचा विषय असलेल्या धनगर आरक्षणासाठी हार्दिक पटेल मैदानात उतरण्याची शक्यता आहे. कारण 16 ऑक्टोबरला सांगली जिल्ह्यातल्या आरेवाडीत होणाऱ्या मेळाव्यासाठी हार्दिकला निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे गुजरातमध्ये पाटीदार समाजासाठी आंदोलन केलेला हार्दिक पटेल आता महाराष्ट्रात धनगर आरक्षणासाठी आंदोलन करताना दिसेल, अशी चर्चा आहे.
लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. त्या पार्श्वभूमीवर धनगर आरक्षणाचा मुद्दा जोर पकडत आहे. 'अखेरचा लढा धनगर आरक्षणासाठी' या मथळ्याखाली युवा भाजपचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी 16 ऑक्टोबर रोजी एक मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी हार्दिक पटेलला आमंत्रित करण्यात आलं आहे.
सांगलीमधील कवठेमहांकाळ इथल्या बिरोबा बन, आरेवाडीमध्ये धनगर आरक्षणासाठी महायज्ञ सुरु केला आहे. घटस्थापनेपासून म्हणजेच 10 ते 16 ऑक्टोबरपर्यंत हा महायज्ञ सुरु राहणार आहे. त्यानंतर 16 ऑक्टोबर रोजी हार्दिक पटेलच्या सभेचे आयोजन करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
बीड
बीड
Advertisement