शेतकऱ्यांची बँक बनली नेत्यांवर मेहेरनजर करणारी बँक; बड्या नेत्याच्या संस्थेचे कोट्यवधीचे व्याज माफीचा डाव
Sangli District Bank News : सांगली जिल्हा बँकेचे CEO जयवंत कडू-पाटील यांनी राजीनामा दिला आहे. राजकीय नेत्यांच्या हिताच्या कर्ज व्याज माफी प्रस्तावाविरोधात हा राजीनामा दिला असल्याचे म्हटले जात आहे.
![शेतकऱ्यांची बँक बनली नेत्यांवर मेहेरनजर करणारी बँक; बड्या नेत्याच्या संस्थेचे कोट्यवधीचे व्याज माफीचा डाव sangli district bank ceo resign against proposal of political influence loan शेतकऱ्यांची बँक बनली नेत्यांवर मेहेरनजर करणारी बँक; बड्या नेत्याच्या संस्थेचे कोट्यवधीचे व्याज माफीचा डाव](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/16/64405f87654da8cdb933d33609bf96e5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sangli Bank News : सांगली जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्याची जोरदार चर्चा सुरू आहे. एका बड्या नेत्याच्या संस्थेच्या हितासाठीच्या प्रस्तावाविरोधात त्यांनी राजीनामा दिला असल्याचे म्हटले जात आहे. जिल्ह्यात सध्या या राजीनाम्याची चर्चा सुरू आहे.
सांगली जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या संस्थाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक त्यांच्यावर मेहेरबान होत असल्याची चर्चा आहे. या नेत्याच्या संस्थाचे कोट्यवधी रुपयांचे व्याज माफ करण्यासाठी जिल्हा बँकेने तजवीज केल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या संस्थाच्या कर्जाचे सुमारे 110 कोटी रूपये व्याज माफ करण्याची तयारी सुरू झालीय. त्याचबरोबर याच नेत्याच्या संस्थांचे 76 कोटी रुपये कर्ज 'राईट ऑफ' करण्याचा निर्णय ही घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
या प्रस्तावित निर्णयाविरोधात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू-पाटील यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. जिल्ह्यातील बड्या नेत्याच्या संस्थाच्या कर्जाचे सुमारे 110 कोटी रूपये व्याज माफ करण्याबरोबर याच नेत्याच्या संस्थांचे 76 कोटी रुपये कर्ज 'राईट ऑफ' करण्याचा निर्णय ही घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे 19 मार्च रोजी जिल्हा बँकेची ऑनलाईन विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेत ओटीएस म्हणजे 'वन टाईम सेटलमेंट योजने'ला मंजुरी देण्यात येणार आहे. 'ओटीएस' अंतर्गत कर्ज आणि व्याजमाफीचा हा प्रस्ताव करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेतील खात्रीलायक सूत्रांनी सांगितली. मात्र या व्याज माफीचा निर्णय होणार आहे की नाही बाबतीत बँकेचे अध्यक्ष, अधिकारी मात्र अधिकृतपणे बोलण्यास अद्याप तयार नाहीत. ज्या नेत्याची कर्ज आणि व्याज माफी होण्याची चर्चा आहे त्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री जयंत पाटील, भाजप खासदार संजय पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, माजी आमदार राजेंद्र देशमुख, सत्यजित देशमुख, आमदार सुमनताई पाटील आदींच्या संस्थाचा समावेश आहे.
सीईओच्या राजीनाम्यामुळे अनेक तर्क-वितर्क
‘सीईओ’ कडू-पाटील यांनी राजीनामा दिल्याने तर्क-वितर्क लढविले जात आहेत. नवीन सीईओंची नियुक्ती होईपर्यंत कडू-पाटील यांना कामाचे आदेश दिले होते. मात्र, बड्या कर्जदारांची वन टाईम सेटलमेंट, राईट ऑफ यावरून संचालक मंडळात वादंग सुरू आहेत. जिल्ह्याच्या बँकिंग वर्तुळातही याची मोठी चर्चा सुरू असताना सीईओ कडू-पाटील यांनी आज राजीनामा दिला. बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक हे विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे मुंबईत आहेत. येत्या दोन दिवसांत सांगलीत येतील. त्यांच्याशी चर्चा करून कडू-पाटील पदभार सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ही कर्ज प्रकरणे बुडीत खात्याला जाण्याची शक्यता
कर्जदार रक्कम
डफळे कारखाना,जत 1 कोटी 50 लाख
महाकंटेंनर्स, कुपवाड 2 कोटी 58 लाख
निनाईदेवी ऊस उत्पादक तोडणी वाहतूक संस्था 5 कोटी 95 लेख
प्रकाश ऍग्रो 4 कोटी 98 लाख
वसंत बझार 1 कोटी 30लाख
नेरला सोसायटी, 1 कोटी 34 लाख
यशवंत ऊस उत्पादक तोडणी वाहतूक संस्था 3 कोटी 33 लाख
महाराष्ट्र विद्युत उत्पादक 6 कोटी 57लाख
शिवशक्ती ग्लुकोज, लेंगरे 91 लाख
निनाईदेवी कारखाना 26 कोटी 81 लाख
माणगंगा तोडणी वाहतूक संस्था 1 कोटी 77 लाख
वसंतदादा सूतगिरणी 1 कोटी 53 लाख
माधवनगर कॉटन मिल 2 कोटी 38 लाख
वसंतदादा शाबू प्रकल्प 1 कोटी 71लाख
लक्ष्मी यंत्रमाग, हिंगणगाव 1कोटी 24 लाख
अग्रणी यंत्रमाग, कवठे महाकाळ 90लाख
जयसिंग यंत्रमाग, कवठे महाकाळ 1 कोटी 1 लाख
सुयोग यंत्रमाग , कवठे महाकाळ 1 कोटी 2 लाख
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)