एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
उजनी धरणातून वाळू उपसा करणाऱ्या 4 बोटी पाण्यातच उडवल्या!
सोलापूर : उजनी धरणातून राजरोस पणे चोरटा वाळू उपसा करणाऱ्या माफियांना आज माढा तहसीलदार सदाशिव पडदुणे यांच्या पथकाने दणका दिला. वाळूने भरलेल्या 4 बोटी पाण्यातच स्फोटकांनी उडवून देण्यात आल्या.
उजनी धरणाच्या सुर्ली गावाच्या परिसरात हा वाळू उपसा सुरु होता. पण कारवाईला गेलेल्या पथकाला मात्र त्यांना पकडण्यात यश येत नव्हते. यावेळी तहसीलदार पडदुणे यांनी गेले 3 दिवस या कारवाईचा पाठपुरावा केल्यावर जवळपास 50 ब्रास वाळूने भरलेल्या 4 बोटींना प्रशासनाने पाण्यातच जलसमाधी दिली, तर 8 ब्रास वाळू असलेला ट्रक आणि 60 ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला आहे.
उजनी धारण परिसरात फार मोठ्या प्रमाणात वाळू असल्याने वाळू माफियांची नजर आता धरणातील वाळूवर होती. मात्र, या कारवाईमुळे वाळूमाफियांना मोठा दणका बसला आहे. या कारवाईत 1 ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पाण्यातील बोटी मधून उपसा करणाऱ्या पाण्यात उद्या टाकून पळून गेले असले तरी पोलीस यांचा शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement