एक्स्प्लोर
राजकुमार बडोलेंसारख्या लोकांना महाराष्ट्रातून हद्दपार करा: छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूर: सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केलेल्या वक्तव्यामुळं आता एक नवा वाद सुरु झाला आहे.
'मराठा मोर्चांचं चुकीचं चित्रण करुन महाराष्ट्रात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सामाजिक न्याय मंत्र्यांना राज्यातून हद्दपार करा', अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. मराठा मोर्चाआधी ते आज कोल्हापुरात एबीपी माझाशी बोलत होते.
काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे
'शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती, बाराबलुतेदारांना एकत्र आणलं. तर शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिला. आता महाराष्ट्रात इतक्या चांगल्या पद्धतीने मोर्चे सुरु असताना आज कुठला तरी गृहस्थ काही तरी बडबड करतो, सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. अशा माणसांना कोल्हापूर नाही तर महाराष्ट्रातून हद्दपार करायला हवं.
सध्या पैसेवाल्यांची आंदोलनं मोठी होत आहे: राजकुमार बडोले
'सध्या पैसेवाल्यांची आंदोलनं मोठी होत आहे. कुणीही उठसूठ आरक्षणाची मागणी करत आहे. असा आक्षेप राजकुमार बडोलेंनी घेतला आहे. इतकंच नव्हे तर कोपर्डीच्या नावाखाली जर कुणी अनुसुचित जातींवर अन्याय केला तर तो आम्ही सहन करणार नाही, प्रसंगी मी राजीनामा देईन.' असं वक्तव्य राजकुमार बडोले यांनी काल केलं होतं.
औरंगाबादेतील इंटरनॅशनल बुद्धिस्ट फेस्टिवलमध्ये ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेसुद्धा व्यासपीठावर होते.
व्हिडिओ
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























