एक्स्प्लोर
सलून, ब्युटीपार्लर्स सुरु होणार, मात्र 'हे' नियम पाळावे लागणार, अधिसूचना जारी
गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून बंद ठेवण्यात आली होती. तेव्हापासून सलूनचालक दुकानं उघडण्यास परवानगी देण्याची विनंती करत होते.येत्या 28 जूनपासून राज्यातले सलून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : राज्य सरकारने काल एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 28 जूनपासून राज्यातले सलून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सलून बंद ठेवण्यात आली होती. तेव्हापासून सलूनचालक दुकानं उघडण्यास परवानगी देण्याची विनंती करत होते. अखेर काल राज्यात सलूनची दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली. मात्र ही केशकर्तनालये, सलुन्स, आणि ब्युटी पार्लर्स सुरु करताना काही अटी सरकारने घातल्या आहेत. याबाबत अधिसूचना देखील काढण्यात आली आहे.
काय आहेत अटी
- केशकर्तन, हेअर डाय, वॅक्सींग, थ्रेडींग याच मर्यादीत सेवा ग्राहकांना देता येतील. त्वचेशी संबंधीत इतर कृती करण्यासाठी सध्या संमती नाही. ही बाब दुकानामध्ये ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल.
- दुकानातील कर्मचाऱ्यांनी ग्लोव्हज, ॲप्रॉन आणि मास्कसारख्या सुरक्षीत साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे.
- ग्राहकाला सेवा दिल्यानंतर प्रत्येक खुर्ची किंवा यासारखी प्रत्येक वस्तू सॅनिटाइज करावी लागेल. अशा दुकानातील वापराचा सर्वसाधारण भाग, पृष्ठभाग हा दर २ तासांनी सॅनिटाइज करणे गरजेचे आहे.
- फक्त एकदाच वापरता येतील असे टॉवेल, नॅपकिन्स यांचा ग्राहकांसाठी वापर करावा लागेल. ज्या वस्तूंची तत्काळ विल्हेवाट लावता येणे शक्य नाही अशी वस्तू प्रत्येक ग्राहकास सेवा दिल्यानंतर सॅनिटाइज करावी लागेल.
- उपरोक्त नमूद सावधगिरीबाबत प्रत्येक दुकानामध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी नोटीस लावण्यात यावी.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























