एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
..तर एसटी कर्मचाऱ्यांची वेतनकपात टळणार, रावतेंचा दिलासा
जे कर्मचारी संपकाळातील चार दिवसांसाठी आठ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील, त्यांची कोणतीही पगारकपात केली जाणार नाही, असं दिवाकर रावते यांनी सांगितलं.
मुंबई : एसटी महामंडळ हे सर्वसामान्य प्रवाशांची सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी नुकत्याच केलेल्या संपाच्या कालावधीतील एक दिवसाच्या गैरहजेरीसाठी फक्त एक दिवसाचा पगार हा दंड म्हणून कापला जाईल, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.
जे कर्मचारी संपकाळातील चार दिवसांसाठी आठ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील, त्यांची कोणतीही पगारकपात केली जाणार नाही, असंही रावते यांनी सांगितलं.
दिवाकर रावते, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
'एसटी आगारातून खाजगी वाहतूक सोडणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा'
महामंडळाचा कोणताही कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेला तर संपाच्या कालावधीतील एक दिवसाच्या गैरहजेरीसाठी एक दिवस विनाकाम- विना वेतन, तसंच आठ दिवसांचा पगार हा दंड म्हणून कपात करण्यात येईल, असा निर्णय 29 जानेवारी 2005 रोजी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार नुकत्याच झालेल्या संपकालावधीसाठी कर्मचाऱ्यांचं 36 दिवसांचं वेतन कापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्रास सोसावा लागू नये यासाठी नुकत्याच झालेल्या संपाच्या बाबतीत या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय रावतेंच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.एसटी संपात सहभागी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापणार
एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनांनी यासंदर्भात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने या दाव्याचा निर्णय लागेपर्यंत 36 दिवसांचं वेतन कापण्याच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचंही दिवाकर रावतेंनी सांगितलं. रावते काय म्हणाले? सर्वसामान्य एसटी कर्मचारी हे नेहमीच प्रवाशांची सेवा करण्याला प्राधान्य देतात. एसटी महामंडळ हे अशा एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत आहे. किंबहुना संपकाळातही या कर्मचाऱ्यांनी एसटीच्या मालमत्तेचं किंवा वाहनांचं कुठल्याही प्रकारे नुकसान न करता शांततेत संप केला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपावर असतानाही अनेक कर्मचाऱ्यांनी एसटी बसेसचं पूजन केलं. या सर्व कर्मचाऱ्यांची एसटीवर प्रामाणिक निष्ठा आहे. एसटीसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांसोबत आम्ही आहोत. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्रास सोसावा लागू नये, यासाठी 36 दिवसांचं वेतन कपात करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात येत आहे, असं दिवाकर रावते म्हणाले. दर दिवसाचा पगार टप्प्याटप्प्याने चार महिन्यात कपात करण्यात येईल. जे कर्मचारी 8 दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील, त्यांची कोणतीही पगारकपात करण्यात येणार नाही, असंही रावतेंनी स्पष्ट केलं. संबंधित बातम्या एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच “एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढा आणि गुन्हे दाखल करा” उद्धव ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का? : इंटकचा सवाल एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार? प्रशासन एसटी संप चिघळवतंय: इंटक अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement