एक्स्प्लोर

वाराणसीतील साईबाबांच्या मूर्तीच्या प्रकरणाचे राज्यात पडसाद; शिर्डीतील साई मंदिरासाठी जागा देणाऱ्या बुटी कुटुंबीयांचीही नाराजी 

वाराणसीमधील या घटनेवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात असताना या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहे. राज्याच्या सर्वच स्थारातून या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.

Maharashtra नागपूर :  वाराणसी शहरातील मंदिरांमधून सनातन रक्षक सेनेच्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे साईबाबांच्या मूर्ती हटवल्याचा प्रकार (Sai Baba Idols Removed From Temples) घडलाय. आतापर्यंत सनातन रक्षक संस्थेने शहरातील 14 मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्ती (Saibaba Idols) हटवून त्यांचे गंगेत विसर्जन केल्याची माहिती आहे. यामध्ये बडा गणेश मंदिराचाही समावेश आहे. दरम्यान देशभरात साईबाबांना (Shirdi Saibaba) मानणारा मोठा भक्त समुदाय आहे. त्यामुळे वाराणसीमधील या घटनेवरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात असताना या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहे. राज्याच्या सर्वच स्थारातून या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली जात असताना, आता महाराष्ट्रातील शिर्डी येथील मंदिरासाठी जागा देणारे गोपाळराव बुटी यांच्या कुटुंबीयांनीही खंत व्यक्त केली आहे.

मूर्ती हटवण्यासंदर्भात जी काही मोहीम अत्यंत दुर्दैवी  

उत्तर प्रदेशात विविध मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यासंदर्भात जी काही मोहीम चालवली जात आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. साईबाबा ना हिंदू होते, नाही ते मुस्लिम होते. ते एक धर्मनिरपेक्ष संत होते आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या संदर्भात असा वाद निर्माण करून भाविकांच्या भावनाशी खेळ करणं, हे  अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया सुभाष बुटी यांनी दिली आहे. सुभाष बुटी यांचे आजोबा गोपाळराव बुटी यांनीच महाराष्ट्रातील शिर्डी येथील मंदिरासाठी जागा दिली होती. शिर्डीतील बुटी यांच्या वाड्यामध्येच साईबाबांनी समाधी घेतली होती. 

मंदिरातून साईबाबांच्या मूर्ती हटवायच्याच असतील, तर ते हटवण्याची पद्धत योग्य असायला हवी. बाबांच्या मूर्ती हटवल्यानंतर भाविकांच्या भावनांचा आदर करत संबंधित मूर्तीची योग्य ठिकाणी प्रतिष्ठापना करून रीतसर पूजाही केली पाहिजे, अशी अपेक्षाही कल्याणी बुटी (सुभाष बुटी यांच्या पत्नी) यांनी व्यक्त केली आहे. 

सरकारने या प्रवृत्तींना अटकाव घालण्याची मागणी 

दुसरीकडे या घटनेचा परभणीच्या पाथरीतील साई जन्मस्थानच्या विश्वस्थानी निषेध केला आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे अनेक मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्ती या पूर्वीपासून आहेत.  अचानक अशी काय घटना घडली की ज्या घटनेमुळे अशा प्रकारचे कृत्य काही विघातक प्रवृत्ती करत आहेत? त्यामुळे या घटनांचा निषेध करत परभणीच्या पाथरी येथील साई जन्मस्थानच्या विश्वस्तानी या प्रवृत्तींना अटकाव घालण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

उत्तरप्रदेशच्या वाराणसी आणि परिसरातील मंदिरामध्ये असलेल्या साईबाबांच्या मूर्ती पाडण्यामागे नेमकं काय कारण आहे? हे कोणाला समजायला तयार नाही, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना करू नयेत. साईबाबा हे हिंदू होते  ते सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहेत. देशातील सर्वच भागात त्यांना माननारा एक मोठा वर्ग आहे. तिथल्या लोकांना नेमका आताच काय झाले आहे, ज्यावरून ते अशा प्रकारचे कृत्य करत आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तींचा निषेध करत या प्रवृत्तींवर कारवाई करण्याची मागणी परभणीच्या पाथरी येथील साईबाबा जन्मस्थान येथील विश्वस्त आणि साई भक्तांनी केली आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : नव्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
व्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shakitpith Kolhapur Mahamarg : कसा असणार शक्तिपीठ महामार्ग? 'माझा'चा स्पेशल रिपोर्टSpecial Report Currency Found: राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकाखाली 500 च्या नोटाZero Hour Mahayuti Fight : पालकमंत्रीपदावरुन महायुतीत चढाओढ? कुणाची वर्णी लागणार?Zero Hour Devendra Fadnavis Exclusive :देवेंद्र फडणीस मित्र पक्षांच्या महत्वकांक्षा कश्या संभाळणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : नव्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
व्या सरकारच्या शपथविधीवेळी तैनात असलेल्या पोलिसाची बॅग चोरीला, एटीएम कार्डसह महत्त्वाचा ऐवज लंपास
Shrikar Pardeshi :  मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी, श्रीकर परदेशी यांची बदली, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
मोठी बातमी ! इकडे उपमुख्यमंत्रीपदी शपथ, तिकडे अजित पवारांची संपत्ती रिलीज; आयकर कारवाईत मोठा दिलासा
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
अर्ज करण्याचा शेवटचा आठवडा, ITBP मध्ये 526 जागांची भरती; पगार 25 हजार ते 1 लाख
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
मोठी बातमी! शरद पवार रविवारी मारकडवाडीत, राहुल गांधींचंही ठरलं; बॅलेट पेपरवाल्या गावात दिग्गजांचं लँडींग
Pravin Darekar: राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर... प्रविण दरेकर म्हणाले...
राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांची मित्रपक्षांबाबत नाराजी, भाजपमधून पहिली प्रतिक्रिया समोर...
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांना साथ, 7 वेळा आमदार, पंचायत सभापती ते मंत्री, मधुकर पिचड यांचा जीवनप्रवास
Embed widget