एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

Shirdi : साई संस्थानविरोधात ग्रामस्थ आक्रमक, प्रवेशद्वारांवर हार घालत जोरदार घोषणाबाजी, शिर्डी ग्रामस्थांची गटबाजी समोर

Shirdi News : साई संस्थान विरोधात शिर्डी ग्रामस्थांकडून भव्य मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. मात्र शिर्डी ग्रामस्थांची गटबाजी यातून समोर आली आहे.

शिर्डी : साई संस्थान (Sai Sansthan) विरोधात शिर्डी (Shirdi) ग्रामस्थांकडून भव्य मोर्चा काढण्यात आला. मंदिराचे चारही प्रवेशद्वार खुले करा, साई मंदिराबाबत कुठलाही निर्णय करताना ग्रामस्थांना विश्वासात घ्या, यासह विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांकडून आंदोलन करण्यात आले. या मोर्चात (Protest) ग्रामस्थ आणि शिर्डीतील व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

साई मंदिर (Shirdi Sababa Mandir) परिसराचे गेट पुर्वीप्रमाणे आत-बाहेर जाण्यासाठी खुले करावे. तसेच मंदिर सुरक्षेसाठी सीआयएसएफ (CRSF) नियुक्त करताना संस्थान प्रशासनाने ग्रामस्थांच्या भावना त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीसमोर ठामपणे मांडाव्यात, त्या समितीत स्थानिक लोकप्रतिनीधींचाही समावेश असावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी ग्रामस्थांकडून याआधी आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात आला. 

शिर्डीत ग्रामस्थांची गटबाजी समोर

यावेळी साई मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारांना हार घालत ग्रामस्थांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दोन दिवसापूर्वी शिर्डी ग्रामस्थांच्या एका गटाने साई संस्थान विरोधात मोर्चा काढला होता. या पाठोपाठ आज दुसऱ्या गटाकडून देखील साई संस्थान विरोधात भव्य मोर्चा काढत जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यामुळे शिर्डीत ग्रामस्थांची गटबाजी समोर आली आहे. 

या आहेत प्रमुख मागण्या 

साईबाबा मंदिराचे चारही प्रवेशद्वार खुले करणे. चारही प्रवेशद्वाराजवळ मोबाईल आणि चप्पल स्टॅन्ड असावे. चारही प्रवेशद्वाराजवळ सशुल्क दर्शन व्यवस्था असावी. साई संस्थान प्रशासनाने साईमंदिरा बाबत कुठलाही निर्णय करताना ग्रामस्थांना विश्वासात घ्यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.  

भाविक व ग्रामस्थांचा छळ

दरम्यान,  संस्थान प्रशासनाने सुरक्षेच्या नावाखाली प्रवेशद्वारांवर निर्बंध घातल्याने भाविक व ग्रामस्थांचा एक प्रकारे छळ सुरू आहे. मंदिर परिसरातील ग्रामदैवतांच्या दर्शनाला जाणेही अवघड आहे. या निर्बंधामुळे शहरातील पश्चिम भाग वगळता सर्व बाजुंचे व्यवसाय पूर्णपणे संपले आहेत. त्यामुळे हे गेट तत्काळ खुले करावे. वृद्ध, अपंग भाविकांना मोठा फेरफटका मारायला लावण्याऐवजी सर्व द्वारांमधून आत-बाहेर जाता यावे, प्रवेशद्वारावर व्हील चेअर, चप्पल, मोबाईल स्टॅन्डची सुविधा असावी, अशी मागणी बुधवारी झालेल्या मोर्चातून करण्यात आली होती. एकाच प्रश्नासाठी शिर्डीतील ग्रामस्थांमध्ये दोन वेगवेगळ्या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्यामुळे या दोन्ही गटाच्या श्रेयवाद लढ्याची चर्चा शिर्डीत चांगली रंगली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Shirdi : खळबळजनक! साई संस्थानच्या रुग्णालयातील कचरा कुंडीत आढळले मृत अर्भक; संस्थानच्या दाव्यानं प्रकरणाचे गूढ वाढलं

Travel : काय सांगता! आता फक्त 6 हजार रुपयांत शिर्डीला जाता येणार? भारतीय रेल्वेकडून देवदर्शनाची संधी! सुविधा जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Exit Poll | रिपब्लिकच्या Exit Poll नुसार महायुतीला 137-157 तर मविआला 126-146 जागाBaramati Public Reaction on Polls : बारामतीकरांनी कुठला दादा निवडला? मतदानानंतर बिनधास्त बोलले!Maharashtra Exit Poll 2024 | तावडेंचा गेम फडणवीसांनी केला? Exit Poll वर सुषमा अंधारेंच प्रतिक्रियाPune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Maharashtra Exit Polls Result : राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
राज्यात काँग्रेसला किती जागा मिळणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी समोर
Maharashtra Exit Polls 2024 : भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
भाजप की काँग्रेस? एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार सर्वात मोठा पक्ष कोणता? अजितदादा-ठाकरेंना किती जागा?
Embed widget