एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अमेरिकेत माझा रिपब्लिकन पक्ष हरल्याचं दुःख, रामदास आठवलेंची ट्रम्प यांच्यावर टीका

अमेरिकेत माझा रिपब्लिकन पक्ष हरल्याचं दुःख आहे. ट्रम्प यांनी माझं ऐकलं असतं तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

नाशिक : डोनाल्ड ट्रम्प यांनी दादागिरी, गुंडगिरी केली हा लोकशाहीला कलंक आहे. अमेरिकेत माझा रिपब्लिकन पक्ष हरल्याचं दुःख आहे. ट्रम्प यांनी माझं ऐकलं असतं तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, बायडन यांनी तिथल्या भारतीयांना नागरिकत्व द्यावं. भारताला सहकार्य करावं, त्यामुळं बायडन आणि पंतप्रधान मोदी यांचे संबंध चांगले होतील, असंही ते म्हणाले.

दिल्लीतील आंदोलन प्रसिद्धीसाठी सुरू शेतकरी आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की, दिल्लीतील आंदोलन प्रसिद्धीसाठी सुरू आहे. शेतकरी आंदोलन असते तर कोर्टाने सांगितल्याने आंदोलन थांबायला हवे होते. हे निरर्थक आंदोलन आहे. सरकारची अडचण लक्षात घेऊन आंदोलन मागे घ्यावे. शरद पवार शेतकरी नेते आहेत, त्यांनीही राजकीय भूमिका घेतली आहे. शरद पवार यांनी मध्यस्थी करणे आवश्यक होते. शेतकरी कायद्याला पाठिंबा द्यायला हवा होता. शेतकरी ऐकाला तयार पण नेते नाहीत, असं ते म्हणाले.

US Inauguration : निरोपाच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'मी पुन्हा येईन...'

मंत्री आठवले म्हणाले की, अर्णब गोस्वामी प्रकरणी राहुल गांधी यांच्या आरोपाला काही अर्थ नाही. मोदींनी माहिती दिली असा आरोप करणं बालिशपणा आहे. अर्णबकडे ही माहिती असेल तर गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. अर्णब गोस्वामी संघर्ष करून पुढे आला ओरडून ओरडून बोलत पुढे आलाय, असं आठवले म्हणाले. आपल्या देशात तयार झालेलं कोरोना व्हॅक्सीन जगातील सर्वोत्कृष्ट व्हॅक्सीन आहे. पंतप्रधान आणि सर्व मंत्रिमंडळ लस घेणार असल्याचं आठवले म्हणाले.

आठवले म्हणाले की, तेलंगणामध्ये आर्थिक दुर्बलांना आरक्षण मिळाले. पण मी 2 वर्षांपासून मागणी करत होतो. त्यांनतर केंद्र सरकारने सवर्णांना आरक्षण दिले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र आले पाहिजे. आम्हाला केंद्र स्तरावर केवळ मराठा नाही तर क्षत्रिय लोकांचा ही विचार करावा लागणार आहे, असंही आठवले म्हणाले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?Prakashrao Abitkar : जनता माझ्यासोबत असल्यानंच माझा विजय - प्रकाश आबिटकरABP Majha Headlines :  2 PM : 24 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Maharashtra Assembly Election Results 2024: बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
बालेकिल्ल्यात महायुतीचंच पारडं जड! छत्रपती संभाजीनगरचे आमदार कोण? वाचा मतदारसंघनिहाय संपूर्ण यादी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार? तानाजी सावंतांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार
MLA List Maharashtra 2024 : महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी 2024, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, जिल्हानिहाय आमदारांची नावे, कोणत्या पक्षाला किती जागा?
Pune Paschim Assembly Election Winner List 2024 : कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
कोल्हापूर, साताऱ्यातून काँग्रेस हद्दपार, सांगलीत फक्त एक; पश्चिम महाराष्ट्रातील 58 आमदारांची यादी एकाच ठिकाणी
Embed widget