US Inauguration : निरोपाच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'मी पुन्हा येईन...'
US Inauguration : आपल्या समारोपाच्या भाषणात Donald Trump gave a farewell speech ट्रम्प यांनी आपला परिवार आणि मित्रांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, काही ना काही करुन आम्ही पुन्हा परत येऊ. मी आपल्यासाठी नेहमीच संघर्ष करत राहिल, असं ते म्हणाले.
US Inauguration : डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाउस खाली केलं आहे. व्हाईट हाऊस सोडल्यानंतर त्यांना वॉशिंग्टन एअरपोर्टवर गार्ड ऑफ ऑनर दिलं गेलं. आपल्या समारोपाच्या भाषणात ट्रम्प यांनी आपला परिवार आणि मित्रांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले की, काही ना काही करुन आम्ही पुन्हा परत येऊ. मी आपल्यासाठी नेहमीच संघर्ष करत राहिल, असं ते म्हणाले. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रम्प स्वत:चा एक नवा पक्ष काढणार असल्याची माहिती आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, आमच्या कार्यकाळात आम्ही अनेक महत्वाचे निर्णय घेतले. तुम्ही सर्वांनी खूप मेहनतीनं काम केलं. माझ्यासाठी हा कार्यकाळ खूप खास राहिला. आम्ही अमेरिकी सेनेला पुन्हा उभं केलं. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक टॅक्सचा भरणा केला, असं ट्रम्प म्हणाले. ते म्हणाले की, आम्ही जेवढ्या मेहनतीनं काम केलं तेवढ्या मेहनतीनं कुणी काम करु शकणार नाही. काही ना काही करुन आम्ही पुन्हा परत येऊ. मी नेहमी आपल्यासाठी संघर्ष करत राहील.
ते म्हणाले की, मी नेहमी आपल्यासाठी लढत राहील. या देशाच्या उज्वल भविष्यासाठी काम करेल. मी नवीन प्रशासनाला शुभेच्छा देतो आणि त्यांच्या यशासाठी प्रार्थना करतो. मला वाटतं की त्यांच्याकडे काही चांगलं करण्यासाठी मजबूत पाया आहे. ट्रम्प म्हणाले की, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आपली आहे. आपल्याला महामारीचा मोठा फटका बसला. आपण असं काही केलं की मेडिकल क्षेत्रात चमत्कार मानला जातो. आपण 9 महिन्यात कोरोनावर वॅक्सिन तयार केलं, असंही ट्रम्प म्हणाले.
- US Inauguration Day 2021 | जो बायडन आज शपथ घेणार; अमेरिकेच्या अध्यक्षांचा पगार किती, सुविधा कोणत्या?
- जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये कडेकोट बंदोबस्त; 35 हजार सुरक्षारक्षक तैनात
- Farewell Speech | अमेरिकेच्या संसदेवरील हल्ल्याचा निषेध करत ट्रम्प यांच्याकडून Joe Biden यांना शुभेच्छा