एक्स्प्लोर

Saamana Editorial: देव, देश, धर्मासाठी प्राण हाती घेणारा महाराष्ट्र हतबल करण्याचं षडयंत्र रचलं जातंय; आसाम सरकारच्या कुरापतीविरोधात सामनातून हल्लाबोल

Saamana Editorial on Assam Government Claim: महाराष्ट्रात मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवतीच लागलीये, असं म्हणत सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

Saamana Editorial on Assam Government Claim: आसाम सरकारनं (Assam Government) महाराष्ट्रातील (Maharashtra News) भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर (Bhimashankar Jyotirlinga) दावा केला आहे. दरम्यान, आसाम सरकारच्या या कुरापतीविरोधात आज सामनाच्या (Saamna) अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. देव, धर्म आणि राष्ट्राचं रक्षण करणाऱ्या महाराष्ट्राला हतबल करण्याचं हे षडयंत्र आहे. त्यामुळे या सरकार विरोधात आता राज्यातील जनतेलाच शिवशंभोचा शंख फुंकावा लागेल असा संताप सामनातून व्यक्त करण्यात आला आहे. 

माझे ते माझे आणि तुझे तेदेखील माझेच, असा उफराटा कारभार केंद्राकडून सुरू आहे, असं म्हणत सामनातून केंद्र सरकारलाही खडे बोल सुनावले आहेत. तर, महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वालाही धडका देण्याचं काम भाजपशासित राज्यांकडून सुरू असल्याचा आरोपही सामनातून करण्यात आला आहे. आता तर त्यांनी आमचे देवही पळविले, आमच्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरच आसाम सरकारने मालकी हक्क सांगितला. लाचार मिंधे सरकारकडून याविरोधात काहीच होणार नाही. राज्यातील जनतेला शिवशंभोंचा शंख फुंकावाच लागेल, असं म्हणत सामनातून थेट शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. 

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय ?  

"महाराष्ट्रात मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवतीच लागली आहे. त्यांच्या बाता विकासाच्या असल्या तरी प्रत्यक्षात महाराष्ट्राचे हक्काचे हिरावून नेण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. केंद्रापासून इतर भाजपशासित राज्यांपर्यंत सगळेच ही लूट करीत आहेत. आता या 'पळवापळवी'त आसाममधील भाजप सरकारची भर पडली आहे. या सरकारने महाराष्ट्रातील एका ज्योतिर्लिंगावरच मालकी हक्काचा दावा ठोकला आहे. सहावे ज्योतिर्लिंग महाराष्ट्राचे नसून आमचे आहे, असे आसाम सरकारने म्हटले आहे. 18 फेब्रुवारीच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आसाम सरकारने वृत्तपत्रांमध्ये काही जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात हा अजब दावा करण्यात आला आहे. देशभरात एकूण 12 ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान शंकराची प्रमुख मंदिरे आहेत. त्यातील सहावे ज्योतिर्लिंग आसाममधील डाकिनी टेकडीवर वसले आहे, असा जावईशोध आसाम सरकारच्या पर्यटन विभागाने या जाहिरातीद्वारा लावला आहे.

वास्तविक पुण्याजवळील भीमाशंकर हे सहावे ज्योतिर्लिंग आहे, ही खूप जुनी मान्यता आहे. शिवलीलामृत, शिवपुराण आणि इतर मान्यताप्राप्त धार्मिक ग्रंथांत सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर येथेच असल्याचे स्पष्ट उल्लेख आहेत. भीमाशंकर हे ठिकाण सहय़ाद्री पर्वताच्या प्रमुख रांगेत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी भीमा नदीचा मूळ उगम ज्योतिर्लिंगात आहे, परंतु तेथे ती गुप्त होते आणि काही अंतरावर जंगलात पुन्हा प्रगट होते, अशी मान्यता आहे. अत्यंत सुंदर नक्षीकाम असलेले भीमाशंकर मंदिर सुमारे 1200 वर्षे जुने आहे आणि त्याची बांधणी हेमाडपंथी आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी हे एक आहे आणि आता कोण कुठले उपटसुंभ आसाम सरकार  म्हणत आहे की, सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर नसून आसाममधील आहे.

महाराष्ट्राच्या धार्मिक स्थळावर डाका टाकण्याचाच प्रकार

हा महाराष्ट्राच्या धार्मिक स्थळावर डाका टाकण्याचाच प्रकार आहे. बरे, सहावे ज्योतिर्लिंग जर आसाममध्ये असल्याचा तुमचा दावा आहे तर मग ही उचकी तुम्हाला आताच का लागली? हा 'साक्षात्कार' तुम्हाला आधी का झाला नाही? आतापर्यंत असंख्य महाशिवरात्री आल्या आणि गेल्या. ना तुम्ही असा दावा केला ना त्याच्या पानभर जाहिराती छापल्या. मग आताच हा नसता उपद्व्याप आसामच्या भाजप सरकारने का केला? या प्रश्नाचे उत्तर साधे आहे. महाराष्ट्रातील मिंधे सरकार आसाम सरकारच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबलेले आहे; कारण या सर्व फुटिरांना आधी गुजरातमधील सुरतमध्ये आणि नंतर आसाममधील गुवाहाटी येथे 'राजाश्रय' मिळाला होता, असा हल्लाबोल सामनामध्ये करण्यात आला आहे.

आसाम सरकारकडून मिंधे गटाचा खास पाहुणचार  

'काय झाडी, काय हाटील…' अशी जंगी बडदास्त ठेवली गेली होती. तेथील मुक्कामापासून कामाख्या मंदिरातील 'विधीं'पर्यंत आसाम सरकारने मिंधे गटाचा खासा पाहुणचार केला होता. त्यामुळेच मिंधे सरकारच्या तोंडून भीमाशंकरप्रकरणी निषेधाचा 'नि'देखील निघू शकलेला नाही. 'या पाहुणचाराच्या बदल्यातच भीमाशंकर ज्योतिर्लिंग तुम्ही त्यांना देऊन आला नाहीत ना?' या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नालाही त्यांच्याकडे काय उत्तर आहे? आधी दिल्लीने मिंधे गटाचा स्वाभिमान आणि अभिमान पळवला. त्यानंतर महाराष्ट्राच्या हक्काच्या गोष्टींची जी पळवापळवी सुरू झाली आहे ती थांबायलाच तयार नाही. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले मोठे प्रकल्प, उद्योग यांच्या नाकासमोरून गुजरातने उघडउघड पळवून नेले. आता आसाम सरकारने यांच्या नाकावर टिच्चून आमच्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर मालकी हक्क सांगितला आहे, असं टीकास्त्र सामनातून सोडण्यात आले. 

मुंबईचा मुकूट हरावण्याचे प्रयत्न

मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून केंद्र आणि इतर भाजपशासित राज्यांचीही अशी मनमानी बिनदिक्कतपणे सुरू आहे. महाराष्ट्राला त्याच्या हक्काचे काही द्यायचे नाही, हक्काचे उद्योग, प्रकल्प इतर भाजप राज्यांत पळवून न्यायचे आणि येथील जनतेच्या प्रखर विरोधाकडे दुर्लक्ष करीत विनाशकारी ठरणारे प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारायचे. देशाची 'आर्थिक राजधानी' हा मुंबईचा 'मुकूट' हिरावण्याचे प्रयत्नही सुरूच आहेत. मुंबईचे जागतिक वित्तीय केंद्र गुजरातमध्ये नेले ते त्यासाठीच. एका भाजपशासित राज्यात झालेली फिल्मसिटी उभारण्याची घोषणा बॉलीवूड मुंबईचे महत्त्व आणि जागतिक सिनेउद्योगाला असलेली मुंबईची झळाळी कमी करण्याचेच उद्योग आहेत. माझे ते माझे आणि तुझे तेदेखील माझेच, असा उफराटा कारभार सध्या केंद्र आणि इतर भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राबाबत सुरू आहे. लाचार मिंधे सरकारमुळे तो महाराष्ट्राच्या मुळावर तर उठला आहेच, पण महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वालाही धडका देऊ लागला आहे. देव, देश आणि धर्मासाठी प्राण हाती घेणारा महाराष्ट्र हतबल करण्याचे मोठे षड्यंत्र रचले गेले आहे. केंद्र आणि भाजपशासित राज्यांकडून महाराष्ट्राचे उद्योग, अर्थकारण, पाणी आणि बरेच काही पळविण्याचे प्रकार या कटकारस्थानाचाच भाग आहेत. आता तर त्यांनी आमचे देवही पळविले! आमच्या भीमाशंकर ज्योतिर्लिंगावरच आसामच्या भाजप सरकारने मालकी हक्क सांगितला. लाचार मिंधे सरकारकडून याविरोधात काहीच होणार नाही. राज्यातील जनतेला शिवशंभोंचा शंख फुंकावाच लागेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP MajhaZero Hour | लाडकी बहीण योजनेसाठी लाच घेतल्याप्रकरणी हिंगोलीत ग्रामसेवक निलंबित ABP MajhaZero Hour | Rohit Sharma पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला! नेमकं काय घडलं?ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines  5 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
Embed widget