एक्स्प्लोर

Russia Ukraine Conflict : रशिया-युक्रेन युद्धाची झळ विदर्भातील व्यापार उद्योगांना; कोट्यवधी रुपये अडकले

Russia Ukraine Conflict : पूर्व विदर्भातील तांदूळ निर्यातकांचे कोट्यवधी रुपये रशिया आणि युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती विदर्भ डेवलपमेंट कौन्सिलचे शिवकुमार राव यांनी दिली आहे.

Russia Ukraine Conflict : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे विपरीत परिणाम आता विदर्भातील काही व्यापार आणि उद्योगांवरही दिसू लागले आहेत. पूर्व विदर्भातील तांदूळ निर्यातकांचे कोट्यवधी रुपये रशिया आणि युक्रेनमध्ये अडकल्याची माहिती विदर्भ डेवलपमेंट कौन्सिलचे शिवकुमार राव यांनी दिली आहे. रशिया आणि युक्रेनचे लोक सकाळी त्यांच्या नाश्त्यात तांदळाची खीर खात असल्याने गेल्या काही वर्षात दोन्ही देशात पूर्व विदर्भातील तांदळाची निर्यात कमालीची वाढली होती. विदर्भ डेव्हलपमेंट कौन्सिल प्रमाणे दर महिन्याला 8 ते 10 हजार टन तांदळाची निर्यात दोन्ही देशात होत होती. मात्र, आता रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक शिपिंग कंपन्यांनी बोटीतून तांदूळ त्या परिसरात नेण्यास नकार दिला आहे.

त्यामुळे पूर्व विदर्भातील तांदूळ निर्यातकांना दर महिन्याला 30 ते 40 कोटींचा नुकसान सोसावे लागणार अशी माहिती शिवकुमार राव यांनी दिली आहे शिवाय रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांनी रशियाच्या बाहेर कुठल्याही प्रकारचे पेमेंट करण्यावर बंदी घातल्यामुळे रशियन व्यापाऱ्यांनी तांदळाचे पैसे थांबवले आहेत. यामुळं जुन्या निर्यातीचे पैसेही मोठ्या प्रमाणावर रशिया आणि युक्रेनमधील व्यापाऱ्यांकडे अडकणार आहे. 

या सर्व परिस्थितीमुळे पूर्व विदर्भातील तांदूळ निर्यातक आर्थिक अडचणीत सापडण्याची भीती शिवकुमार राव यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान विदर्भातील अनेक औषध निर्माते काही प्रमाणात औषधांची ही निर्यात रशिया आणि युक्रेन ला करत असल्यामुळे त्यांच्या निर्यातीलाही युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसणार अशी भीती विदर्भ डेव्हलपमेंट कौन्सिलने व्यक्त केली आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

इतर महत्वाच्या बातम्या

Ukraine Russia War : तिसरं महायुद्ध झाल्यास कोणत्या देशाची कोणाला साथ? भारताची भूमिका काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?

व्हिडीओ

Revati Sule : सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचं लग्न ठरलं? Special Report
Rahul Gandhi at Loksabha : संसदेत तिसऱ्या दिवशी तरी वादाची कोंडी फुटली की नाही? Special Report
Raj Thackeray Tweet On RSS : राज ठाकरेंचे मोहन भागवतांना पत्र Special Report
Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांनी स्वीकारला पदभार, आठवणींचा गहिवर Special Report
Chandrapur Mayor Politics : चंद्रपुरात कसं जुळलं ठाकरे आणि भाजपचं सूत? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
Photo : अर्जुनच्या लग्नाचे निमंत्रण, सचिन तेंडुलकरची दिल्लीवारी
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
कामगार बापाकडे पैशांची मागणी, 11 हजारांची लाच घेताना सेतू केंद्रचालकास रंगेहात बेड्या ठोकल्या
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
''राम सातपुतेंच्या हत्येचा कट रचला गेला होता''; मंत्री जयकुमार गोरेंचा गंभीर आरोप, साताऱ्यातील पराभवावरही बोलले
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
मुंबईत DRI ची मोठी कारवाई, झवेरी बाजारातून 5.8 किलो सोनं जप्त, वितळवण्याची मशिनही ताब्यात, किंमत किती?
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
'पायलटला ही घटना घडवायचीच होती का?' अजित पवारांच्या निधनावर रोहित पवारांना वेगळाच संशय; पुरावेच आणले समोर
Makrand Patil : माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
माझ्या मतदारसंघात आणि पाटणमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना जनतेनं चपराक दिली, बालेकिल्ला जिंकताच मकरंद पाटील यांचं वक्तव्य
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
मोठी बातमी! एकनाथ खडसेंना हायकोर्टाकडून मोठा दिलासा; पुण्यातील भोसरी जमीन घोटाळाप्रकरणातील खटला
Sanjay Jadhav : परभणीत काँग्रेससोबत राहील, संजय जाधव यांना विश्वास, अजित पवारांच्या एका फोन कॉलचा संदर्भ देखील सांगितला
परभणीत काँग्रेससोबत निवडणूकपूर्व आघाडी होती,आमचा चांगला समन्वय, काँग्रेस सोबत राहणार: संजय जाधव
Embed widget