कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीत कोरोना नियमांचा फज्जा; ना मास्क, ना सोशल डिस्टसिंग
Rupali Chakankar : कल्याणमध्ये विविध कार्यक्रमासाठी महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आल्या होत्या. त्यांनी कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयास भेट दिली.
Rupali Chakankar : जगभरात खळबळ उडवून देणाऱ्या ओमयक्रोन व्हेरियंटने कल्याण डोंबिवलीत प्रवेश केलाय. ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून आणि महापालिकेडून कोरोना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केले जात आहे. कल्याणात मात्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन दिसून आले. कल्याणमध्ये विविध कार्यक्रमासाठी महिला राज्य आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आल्या होत्या. त्यांनी कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी जिल्हा कार्यालयास भेट दिली. या दरम्यान मोठय़ा प्रमाणात महिला कार्यकर्त्या उपस्थीत होत्या. रुपाली चाकणकर यांनी महिला कार्यकर्त्या-पदाधिकार्यांशी संवाद साधला. मात्र या कार्यक्रमादरम्यान बहुतांश महिलांच्या तोंडावर मास्क नव्हता आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. याविषयी चाकणकर यांना विचारणा केली असता त्यांनी सगळ्यांनी मास्क वापरावे असं आवाहन केलं. तसेच आज काहींनी मास्क वापरलं नव्हतं, याबाबत आज कडक सूचना देण्यात येईल असं सांगितलं.
बालविवाह रोखण्यासंदर्भात राज्य महिला आयोगाकडून कठोर पावले उचलली जात असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली. ज्या ग्राम पंचायतीमध्ये बालविवाह होईल, तेथील सरपंच, त्या लग्नाची खोटी नोंद करणारे रजिस्टर अधिकारी यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यास तत्काळ त्याचे पद रद्द करण्यात यावे, अशी शिफारस सरकारकडे महिला आयोगाने केल्याचं चाकणकर यांनी सांगितलं. लोकप्रतिधीच्या सहभाग वाढल्याशिवाय बालविवाह रोखले जाणार नाहीत .ज्या ग्राम पंचायतीमध्ये बालविवाह होईल ,त्या तेथील सरपंच ,त्या लग्नाची खोटी नोंद करणारे रजिस्टर अधिकारी यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यास तत्काळ त्याचे पद रद्द करण्यात यावे अशी शिफारस राज्य महिला आयोगाकडून सरकारकडे करण्यात आली आहे .जोपर्यंत लोकप्रतिनिधी या चळवळीत सहभागी होत नाहीत तोपर्यंत या समाजाला घातक असलेल्या परंपरा बंद होणार नाहीत, असं चाकणकर यांनी स्पष्ट केलं. शक्ती विधेयक मंजूर करण्याबाबत महिला आयोगाचा पाठपुरावा असून येत्या अधिवेशनात विधेयक मंजूर होईल अशी अपेक्षा चाकणकर यांनी यावेळी व्यक्त केली
रुपाली चाकणकर यांचं हेल्पलाईन नंबर विषयीचे आवाहन -
राज्यातील पोलिस आयुक्त आणि अधीक्षकांना सूचना करण्यात आली आहे की, शहरी भागासाठी 1091 आणि ग्रामीण भागात 112 हा हेल्पलाईन नंबर महिलांसाठी सुरु करण्यात आला आहे. महिलांना कोणताही त्रास असल्यास महिलांनी या नंबरवर संपर्क साधवा. दहा ते पंधरा मिनिटांत पोलीस मदतीसाठी पोहचतील असे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले.