एक्स्प्लोर
प्रशिक्षकावर चाकूहल्ला, कविता राऊतसह शेकडो अॅथलिट्सकडून निषेध

नाशिक: अॅथलेटिक्स प्रशिक्षक वैजनाथ काळे यांच्यावर शुक्रवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकाळी नाशिकमध्ये निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका आथरे यांच्यासह शेकडो खेळाडूंनी निषेध रॅलीत सहभाग घेतला. काळे कपडे परिधान करुन सर्वांनी हल्ल्याचा निषेध नोंदवला.
प्रशिक्षक वैजनाथ काळे शुक्रवारी सकाळी गोदापार्कमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रशिक्षण देत होते. त्यावेळी दोन मद्यपी टवाळखोरांनी या मुलींची छेड काढण्याचा प्रयत्न केला.
त्याबाबत जाब विचारायला गेलेल्या वैजनाथ काळे यांच्यावर त्या टवाळखोरांनी थेट चाकूहल्ला केला. पोटावर आणि डोक्यावर जबरी वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
विशेष म्हणजे गोदापार्कवरच मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांनी हा सर्व प्रकार बघितला आणि पोलिसांना याबाबत तात्काळ माहिती दिली.
काळे यांच्यावर हल्ला करुन पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या गंगापूरमधील नयूश कडलग आणि म्हसरुळ परिसरातील समीर कांबळे यांना प्रशिक्षण घेत असलेल्या मुलींनी आणि नागरिकांनी पकडून ठेवलं. तसंच त्यांना चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
नाशिकमध्ये खरं तर खेळाडूंसाठी मैदानेच शिल्लक राहिली नाहीत, मात्र आता जॉगिंग ट्रॅकवरही असे हल्ले होत असल्याने खेळाडूंमध्ये भीतीचं वातावरण आहे.
संबंधित बातम्या
नाशकात अॅथेलेटिक्स कोचवर चाकू हल्ला
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
